Mumbai-Goa highway : मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी; चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगाच रांगा!

मुंबई : गणेशोत्सवाला (Ganeshotsav) काही तास उरले असताना बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी गावाकडे निघाले आहेत. मुंबई आणि नवी मुंबईसह पश्चिम उपनगर आणि शहराच्या विविध भागांमधून चाकरमान्यांनी गावाची वाट धरली आहे. त्यामुळे आज पहाटेपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa highway) वाहनांच्या मोठ्या रांगा (Traffic Jam) लागल्याचे दिसून येत आहे. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी झाली आहे. या कोंडीमुळे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले असून त्यांना नाहक मनस्तापाचा सामना करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्रीपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर कोकणात जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. या वाहतूक कोंडीमध्ये गणेशोत्सवासाठी चाकरमानी अडकले असून महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे ही वाहतूक कोंडीची समस्या आणखी डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या महामार्गावर वाहनांच्या ६ ते ७ किमीपर्यंत रांगा लागल्या असून साधारण एक ते दिड तासापर्यंत वाहने जागीच ठप्प असल्याची माहिती मिळाली.


दरम्यान, महामार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी महामार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महामार्गावर ठिकठिकाणी तात्पुरते दुभाजक लावण्यात आले असून, पोलीस यंत्रणेकडून ड्रोनचाही वापर करण्यात येत आहे. त्याचबरोबर सध्या महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्यात आली आहे. परंतु दिवस जसजसा पुढे जाईल तसे आणखी चाकरमानी गावाची वाट धरतीलही, त्यामुळे वाहतूक कोंडी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या