Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीLalbaug Bus Accident : लालबागमधील भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू, ९ प्रवासी...

Lalbaug Bus Accident : लालबागमधील भीषण अपघातात एका तरुणीचा मृत्यू, ९ प्रवासी गंभीर, तिघांची प्रकृती चिंताजनक

मुंबई : एका दारुड्यामुळे (Lalbaug Bus Accident) मुंबई (Mumbai Crime) हादरली आहे. मुंबईतील (Mumbai News) गजबजलेल्या लालबाग (Lalbaug News) परिसरात बसने अनेक वाहनांना (accident in Lalbaug) धडक दिली. या अपघातात (Accident News) जखमी झालेल्या नऊ पादचा-यांपैकी एका २८ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

बेस्टची ६६ क्रमांकाची (BEST Bus 66 No) बस लालबागमध्ये गेल्यानंतर बसमधून प्रवास करणा-या एका मद्यधुंद प्रवाशाने ड्रायव्हरसोबत झटापट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या प्रवाशाने ड्रायव्हरचे स्टेअरिंग हिसकावून घेतले. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अनियंत्रित बसने दोन मोटारसायकल, एक कार आणि अनेक पादचा-यांना धडक दिली. या घटनेतील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

काळाचौकी पोलीस ठाण्याच्या अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पिअर येथून एक इलेक्ट्रिक बस सायनमधील राणी लक्ष्मीबाई चौकाकडे जात असताना ही घटना घडली.

बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ६६ क्रमांकाची बस राणी लक्ष्मी चौकच्या दिशेने जात असताना गणेश टॉकीजच्या दरम्यान एका दारुड्या प्रवाशाने वाहकाबरोबर झटापट केली. त्यानंतर वाहकाचं गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस अनियंत्रित होऊन फुटपाथच्या दिशेने गेली.

या दरम्यान, फुटपाथवरुन जाणारे काही पादचारी जखमी झाल्याचे समजले आहे. पोलिसांनी बसमधील दारुड्या प्रवाशाला ताब्यात घेतले आहे. त्यासोबतच, वाहक आणि चालक यांना काळाचौकी पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे.

Lalbaug Accident : कुटुंबाचा एकुलता एक आधार हरपला; मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -