Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीMilk Price Hike : मुंबईकरांवर महागाईची झळ! मुंबई दूध उत्पादक संघाकडून दरवाढ...

Milk Price Hike : मुंबईकरांवर महागाईची झळ! मुंबई दूध उत्पादक संघाकडून दरवाढ लागू

‘असे’ असतील नवे दर

मुंबई : सध्या देशभरात सर्वांच्या लाडक्या बाप्पाच्या (Ganeshotsav) आगमनाची तयारी सुरू आहे. अशा सणासुदीच्या काळात गोडाचे पदार्थ बनविण्यासाठी दुधाची (Milk) अधिक मागणी असते. काही महिन्यांपूर्वीच अनेक दूध कंपन्यांनी दरवाढ (Milk Price Hike) केली होती. त्यामुळे ग्राहकांना जोरदार झटका बसला होता. त्यानंतर आता पुन्हा मुंबईत दुधाच्या किंमतीत वाढ होणार असल्याचे चिन्ह दिसून येत आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने शहरातील म्हशीच्या दुधाच्या घाऊक किंमतीत वाढ केली आहे. नवे दर हे १ सप्टेंबरपासूनच लागू होणार असल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांचे ऐन सणांच्या काळात बजेट बिघडणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई दूध उत्पादक संघाने (एमएमपीए) मुंबई शहरातील म्हशीच्या दुधाच्या घाऊक किंमतीत २ टक्के वाढ केली आहे. सध्या १ लीटरच्या दुधाची किंमत ८७ रुपये प्रति लीटर इतकी आहे. मात्र नवीन दर लागू झाल्यानंतर म्हशीच्या दुधाची किंमत ८९ रुपये प्रति लीटर तर दुधाच्या घाऊक किंमती ९३ ते ९८ रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढ होऊ शकते. हा निर्णय मुंबई दूध उत्पादन संघटनेने एकमतानुसार घेतला आहे. या दरवाढीचा परिणाम ग्राहकांसह मुंबईतील किरकोळ विक्रेत्यांवर देखील होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, जानेवारी २०२४ मध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळाने खासगी प्रकल्प आणि सहकारी संस्थांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति लिटर INR ५ अनुदान देण्याची घोषणा केली होती. दुग्ध व्यवसायिकांना आधार देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -