Thursday, March 27, 2025
Homeताज्या घडामोडीपाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय नराधमांच्या विरोधात आदिवासी चौकात निषेध...

पाच वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या परप्रांतीय नराधमांच्या विरोधात आदिवासी चौकात निषेध मोर्चा

जव्हार(मनोज कामडी)– बदलापूर ची घटना ताजी असतांनाच नुकतीच जव्हार तालुक्यातील ओझर गावातील एका गरिबी आदिवासी कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकलीवर बुधवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याची घटना जव्हार तालुक्यातील ओझर गावात घडली. या घटनेने जव्हार शहरात आदिवासी युवकांची निषेध नोंदवून सर्वत्र खळबळ उडाली आहे.

सदर आरोपी ओझर येथे बीएसएनएल कंपनीच्या टॉवरवर काम करणाऱ्या आला होता. परप्रांतीय १९ वर्षीय युवकांने सदर मुलीला मांडीवर घेऊन तिच्या सोबत लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली असुन सदर घटनेबाबत मुलींच्या पालकांनी जव्हार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून ताबडतोब जव्हार पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधीत आरोपीचा शोध घेतला असता सदर आरोपी तिथून पळून गेल्याचे कळले.

त्यानंतर युवा आदिवासी संघ जव्हार यांच्या कार्यकर्त्यांनी रात्री याबाबत माहिती मिळताच जव्हार तालुक्यात बीएसएनएल टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन संबंधित आरोपींना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. सदर आरोपीचे नाव इस्तियाक जुमरती अन्सारी वय वर्ष १९ असून त्याच्यावर भारतीय न्याय संहिता (बी एन एस)-२०२३कलम ६४,६५,६५(२),बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ कलम ४,कलम ८ नुसार गुन्हा नोंदवून आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सदर घटना ही अत्यंत निदनीय असून याबाबत जव्हार परिसरातील सर्व धार्मिक समाज बांधव एकत्र येऊन गुरुवारी युवा आदिवासी संघ मार्फत आदिवासी क्रांतिकारक चौक येथे सदर घटनेचा निषेध करण्यात आला असून या सदर आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, तसेच परप्रांतीय आलेल्या नागरिकांची तपासणी झाली पाहिजे,महिलांना सुरक्षा मिळाली पाहिजे अश्या विविध मागण्यांबाबत सहाय्यक जिल्हाधिकारी,तहसीलदार, पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन सदर घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला.यावेळी युवा आदिवासी संघाचे पदाधिकारी, सर्व आदिवासी समाज बांधव, महिला भगिनी, सरपंच संघटना पदाधिकारी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -