शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी
न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी
मुंबई : सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईची इष्टदेवता आहे. या मंदिरात महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. सिद्धिविनायक मंदिराच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारकडून ५०० ते ६०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. या पुनर्विकासात मंदिराची स्थापना करणाऱ्या येथील आगारी समाजाच्या देऊबाई पाटील यांच्या स्मृतींचे जतन व्हावे, अशी मागणी शिवसेना उपनेत्या आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर आणि न्यासाच्या सदस्या मीनाताई कांबळी यांच्याकडे केली आहे.
Malegaon : काही दिवसांपूर्वी मालेगाव येथून एक खळबळजनक प्रकरण समोर आले होते. येथील सटाणा नाका परिसरातील एका खासगी रुग्णालयात एका अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर ...
लवकरच सिद्धिविनायक मंदिराचा पुनर्विकास केला जाणार आहे. मात्र शेकडो वर्षांपूर्वी देऊबाई पाटील या आगारी समाजातील स्थानिक महिलेने स्वखर्चाने या मंदिराची स्थापना केली होती. त्यामुळे मंदिराचा पुनर्विकास करताना देऊबाई पाटील या महिलेचा यथोचित सन्मान व्हावा किंवा पाटील दाम्प्त्याचा कायमस्वरुपी तिथं नामफलक किंवा कोनशिलेवर उल्लेख व्हावा, अशी मागणी मंदिर न्यासाकडे करण्यात आल्याचे शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सांगितले.
ज्यांच्यामुळे मंदिर उभं राहिलं त्या देऊबाई पाटील यांच्या स्मृतींचे पुनर्विकासानंतर मंदिर परिसरात जतन व्हावे, त्यांच्या वारसांना तेथे जागा देण्यात यावी, याकरिता मंदिर न्यासाचे अध्यक्ष सदा सरवरणकर आणि सदस्या मीनाताई कांबळी यांना पत्राद्वारे मागणी केल्याचे शीतल म्हात्रे यांनी सांगितले.






