मुंबई : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) काँग्रेसमध्ये विलीनीकरण होणार असल्याच्या चर्चांनी सध्या चांगलाच जोर धरला आहे. काँग्रेसकडून शरद पवारांच्या पक्षाला तसा रीतसर प्रस्तावही आल्याचा दावा खुद्द नाना पटोले यांनी केला आहे. मात्र, या सर्व चर्चांना खासदार सुप्रिया सुळे यांनी पूर्णविराम दिला आहे. "आमच्या पक्षाचा काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव नाही. शरद पवार यांच्याकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि पवारांनीही कोणाला असा प्रस्ताव दिलेला नाही," असे त्यांनी शनिवारी स्पष्ट केले.
शिवसेना उपनेत्या, प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांची मागणी न्यासाचे अध्यक्ष सदा सरवणकर यांच्याकडे पत्राद्वारे मागणी मुंबई : सिद्धिविनायक मंदिर हे ...
मुंबईत माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी विलीनीकरणाच्या चर्चेवर सडेतोड भाष्य करत पक्षाची अधिकृत भूमिका मांडली. सुप्रिया सुळे म्हणाल्या, "आमचा कोणताही आमदार, खासदार किंवा अन्य कोणत्याही नेत्याशी कोणाचाही संपर्क झालेला नाही. आम्हीदेखील या विषयावर कोणाशीही बोललेलो नाही. त्यामुळे विलीनीकरणाची ही चर्चा नेमकी कुठून सुरू झाली आणि ती कोणी सुरू केली, याबद्दल मला कोणतीही कल्पना नाही."
आसाम : आसाममधील जोरहाट येथील भारतीय हवाई दलाच्या एअरफोर्स स्टेशनवर शनिवारी सकाळी झालेल्या AN-३२ मालवाहू विमानाच्या भीषण अपघातात पायलटसह पाच जवान शहीद ...
तृणमूल काँग्रेसविषयी विचारले असता त्या म्हणाल्या, "तृणमूल काँग्रेसच्या विलीनीकरणाविषयी नेमके काय सुरू आहे, याची मला माहिती नाही. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांची बैठक काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत झाली. या बैठकीत त्या दोघीच होत्या. त्यामुळे त्या दोघींमध्ये काय चर्चा झाली आणि त्यांनी माध्यमांना विलीनीकरणाविषयी काही सांगितले आहे की नाही, याची मला माहिती नाही. तसेच याबाबत माझ्या वाचनातही काही आलेले नाही."






