Thursday, March 20, 2025
Homeताज्या घडामोडीNavra maza navsacha 2 : प्रवासाला येताय ना? नवरा माझा नवसाचा २...

Navra maza navsacha 2 : प्रवासाला येताय ना? नवरा माझा नवसाचा २ चा धमाकेदार टीझर आऊट!

२० सप्टेंबरपासून होणार धमाल सुरु

मुंबई : ‘नवरा माझा नवसाचा’ (Navra maza navsacha) या मराठीतल्या सुपरडुपर हिट चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) दिग्दर्शित या चित्रपटात यंदा कोकण रेल्वेचा प्रवास पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा धमाकेदार टीझर आज प्रदर्शित (Teaser out) झाला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच चाहत्यांनी या टीझरवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

काही दिवसांपूर्वी ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटातील पहिलं गाणं प्रदर्शित झालं होतं. या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आज या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. “‘नवरा माझा नवसाचा २’च्या टीझरने आज नॉनस्टॉप कॉमेडी एक्स्प्रेसच्या प्रवासाला सुरुवात होतेय”, असं कॅप्शन देत लेखक, दिग्दर्शक, निर्माते सचिन पिळगांवकर यांनी चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर केला आहे.

चित्रपटाच्या पहिल्या भागात शेवटी चोरी झालेले हिरे मिळाल्याचं दाखवलं होतं. आता दुसऱ्या भागात टीझरच्या सुरुवातीलाच एक वृत्तनिवेदिका सरकारी तिजोरीतून हिऱ्यांची चोरी झाल्याची बातमी देते. दोन चोर हे हिरे चोरुन पसार झाल्याचं समजतं. तर दुसऱ्या बाजूला भक्ती व वॅकी आपल्या कुटुंबासह कोकणात प्रवास करताना दिसत आहेत. पण यावेळी बाप्पाची मूर्ती हरवल्यामुळे भक्ती गोंधळ घालताना दिसते. या कोकण प्रवासादरम्यान बरीच धमाल होताना दिसत आहे. टीझरचा शेवट बाप्पाच्या जयघोषात होतो शिवाय बाप्पाची मूर्ती देखील सापडल्याचं पाहायला मिळतं. ‘नवरा माझा नवसाचा २’ चित्रपटात (Navra Maza Navsacha 2) तो हिरे चोरणारा कोण असेल? आणि बाप्पाची हरवलेली मूर्ती कशी सापडते? हे पाहणं रंजक ठरणार आहे.

‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटाची निर्मिती सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेने केली आहे. चित्रपटाची कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले, आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट पुढच्या महिन्यात म्हणजे २० सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -