Monday, July 22, 2024
HomeदेशPM Modi Oath Ceremony: मै नरेंद्र दामोदरदास मोदी... नरेंद्र मोदी बनले तिसऱ्यांदा...

PM Modi Oath Ceremony: मै नरेंद्र दामोदरदास मोदी… नरेंद्र मोदी बनले तिसऱ्यांदा पंतप्रधान

नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी आज तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती भवनात हा शपथविधी सोहळा रंगत आहे.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कॅबिनेटमध्ये ७१ मंत्री शपथ घेत आहेत. मोदींच्या ३.० कॅबिनेटमध्ये ३० कॅबिनेट मंत्री, ५ राज्य मंत्री(स्वतंत्र प्रभार) आणि ३६ राज्य मंत्री शपथ घेत आहेत.

नरेंद्र मोदींच्या नंतर राजनाथ सिंह यांनी मोदी ३.०मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. राजनाथ सिंह गेल्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते. लखनऊचे ते नवनिर्वाचित खासदार आहेत.

त्यानंतर भाजप नेते अमित शाह यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या सरकारमध्ये अमित शाह केंद्रीय गृहमंत्री होते. ते गुजरातचे चार वेळा खासदार आहेत.

अमित शाह यांच्यानंतर नितीन गडकरी यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नितीन गडकरी गेल्या सरकारमध्येही मंत्री होते.

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या रेकॉर्डशी बरोबरी केली आहे.

लोकसभा २०२४च्या निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही मात्र एनडीए गठबंधनला २९३जागांवर यश मिळाले. हा आकडा बहुमतापेक्षा अधिक आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -