नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ते राष्ट्रपती भवनात पोहोचले आणि त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला राजीनामा सुपूर्द केला. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे. तसेच त्यांना कार्यवाहक पंतप्रधान बनण्याचा सल्ला दिला आहे.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती मुर्मू यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत यात ते राजीनामा सोपवताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींनी दिल्लीतील एनडीएच्या होणाऱ्या बैठकआधी राष्ट्रपती मुर्मूंना राजीनामा सोपवला आहे.
राष्ट्रपतींच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी केंद्रीय मंत्रिपरिषदेसोबत आपला राजीनामा सादर केला आहे. राष्ट्रपतींनी हा राजीनामा स्वीकारला आहे.
Prime Minister @narendramodi called on President Droupadi Murmu at Rashtrapati Bhavan. The Prime Minister tendered his resignation along with the Union Council of Ministers. The President accepted the resignation and requested the Prime Minister and the Union Council of Ministers… pic.twitter.com/1ZeSwQFU1y
— President of India (@rashtrapatibhvn) June 5, 2024
भाजपला बहुमत न मिळाल्याने बिघडली गोष्ट
खरंतर भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला २९४ जागांसह बहुमत मिळाले आहे. अशातच एनडीए सरकार बनवण्याची अधिक शक्यता आहे. भाजपला आपल्या बळावर बहुमत मिळवता आलेले नाही. याच कारणामुळे राजकारणात चर्चा रंगली आहे की एनडीएचे सहकाही पक्ष त्यांना सोडणार नाहीत.
जर अशी स्थिती बनली तर एनडीएसाठी पुन्हा सत्तेत येणे कठीण आहे. सर्वाधिक चर्चा होत आहे ती बिहारचे मु्ख्यमंत्री आणि जदयू प्रमुख नितीश कुमार आणि टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडूंबाबत चर्चा होत आहे.