Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीSatbara : आता सातबारावर दिसणार आईचे नाव!

Satbara : आता सातबारावर दिसणार आईचे नाव!

पुणे : शाळेच्या दाखल्यासह विविध सरकारी कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) याआधीच घेतला आहे. आता आणखी एका महत्त्वाच्या कागदपत्रांमध्ये आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे. सातबारा (Satbara) उताऱ्यावर अर्जदाराच्या नावानंतर आता त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाकडून (Land Record Department) घेण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच अनुषंगाने १ मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे. त्या संदर्भात भूमी अभिलेख विभागामार्फत संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

सहा महिन्यांत होणार अंमलबजावणी

दरम्यान, सातबारा उताऱ्यात आईच्या नावासाठी नवा कॉलम तयार केला जात आहे. त्यामुळे पुढील सहा महिन्यांत याची अंमलबजावणी होईल अशी माहिती मिळाली आहे. त्यासोबत आईचे नाव लावण्यासाठी काही कागदपत्रे गरजेची आहेत. आई असल्याचा पुरावा दिल्यानंतरच आईचे नाव लावता येणार आहे. तसेच तलाठी कार्यालयात शहानिशा केल्यानंतर ही नोंदणी होईल असे सांगण्यात आले आहे.

विवाह आधीच्या नावानेही होईल नोंदणी

सध्या महिलांची नावे लावताना महिलेचे स्वत:चे नाव, पतीचे नाव आणि आडनाव असा क्रम आहे. मात्र सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावताना त्यांचे आधीचे म्हणजे लग्नापूर्वीचे नाव देखील लावण्याची मुभा असणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -