Monday, April 27, 2026

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Crime : पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल, मित्रावर संशय गेला; पारा चढला अन मित्रानंच मित्राचा काटा काढला

Beed Crime : बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढल्याचं चित्र आहे. बीडमध्ये मैत्रीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिरूर पोलिस (Shirur Police) स्टेशनच्या हद्दीत एका १९ वर्षीय अल्पवयीन मुलाची त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या (Beed Murder Case) केली. पत्नीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकल्याच्या कारणावरून तरुणाची त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. नारायण गडाच्या पायथ्याशी घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.सुमित सुशांत गवते (वय १९) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी रुस्तुम गोवर्धन गवते याच्या पत्नीचे काही आक्षेपार्ह फोटो सुमितने इतरांना दाखवल्याचा आणि सोशल मीडियावर टाकल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून मागील काही दिवसांपासून सुमित आणि आरोपींमध्ये वारंवार खटके उडत होते. याच रागाचा शेवट सुमितच्या हत्येनं झाला.

मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव, सुमितचा घटनास्थळीच मृत्यू

२६ एप्रिल रोजी रात्री साडेसात ते साडेआठ वाजेच्या दरम्यान आरोपींनी सुमितला नारायण गड देवस्थानाच्या पायथ्याशी असलेल्या हेलिपॅडच्या मोकळ्या जागेत गाठले. चौघांनी सुमितचे हातपाय घट्ट पकडले आणि एकाने धारदार चाकूने त्याच्या पोटात सपासप वार केले. हल्ल्यानंतर सुमित रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात नेण्यासाठी वेळेवर वाहन उपलब्ध होऊ शकलं नाही. परिणामी, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे सुमितचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच शिरूर कासार पोलिसांनी (Shirur Police) तातडीने तपासचक्र फिरवून आरोपी ज्ञानेश्वर लाटे याला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून, उर्वरित तीन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. रितेश सतीश बहिर (होमगार्ड), रुस्तुम गोवर्धन गवते आणि सूरज मच्छिंद्र नागरगोजे अशी फरार आरोपींची नावं आहेत.

बीडमध्ये खुनाचे सत्र सुरूच

मागील काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये (Beed Murder Case) मोठी वाढ झाली आहे. शिरूर परिसरात घडलेल्या या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नारायण गडासारख्या पवित्र स्थळाच्या पायथ्याशी अशा प्रकारे रक्ताचा सडा पडल्याने भाविक आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >