Tuesday, April 29, 2025

देशताज्या घडामोडी

Mizoram News : मिझोरममध्ये चक्रीवादळाचा विध्वंस अन् पावसाचा कहर!

Mizoram News : मिझोरममध्ये चक्रीवादळाचा विध्वंस अन् पावसाचा कहर!

दगडाची खाण कोसळल्याने १० जणांचा मृत्यू; अनेक घरं जमीनदोस्त

मिझोरम : बंगालच्या उपसागरात तयार झालेलं रेमल चक्रीवादळ (Remal Cyclone) पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशच्या किनारपट्टीला धडकल्यामुळे अनेक ठिकाणी चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात विध्वंस पाहायला मिळाला. त्यासोबत राज्यात पडणाऱ्या अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) कहर देखील पाहायला मिळला आहे. काही ठिकाणी वीज पडून लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या शेतीचं व घराचं नुकसान झालं आहे. अशातच फक्त राज्यातच नाही तर मिझोरममध्ये (Mizoram) देखील आता वादळी पावसाचं थैमान दिसून येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेमल चक्रीवादळामुळे मिझोरमची राजधानी आयझॉल येथे एक धक्कादायक घटना घडल्याचे उघडकीस आले आहे. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे आज सकाळी सहाच्या सुमारास आयझॉलच्या मेल्थम सीमेवर दगडाची खाण कोसळली (Stone Mine Collapsed). खाण कोसळल्यामुळे दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक लोक ढिगाऱ्याखाली दबले गेल्याची माहिती मिळत आहे.

पावसामुळे बचावकार्यात अडथळा

मिझोरम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत दहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, मात्र अनेक जण अजूनही अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे बचावकार्यावर परिणाम होत असला तरीही बचावकार्य सतत सुरु राहील, असे डीजीपी अनिल शुक्ला यांनी सांगितले.

Comments
Add Comment