Saturday, May 10, 2025

महाराष्ट्रब्रेकिंग न्यूजराजकीयमहत्वाची बातमी

Nitesh Rane : कोल्हापुरच्या गादीबद्दलचा नियम सातार्‍याला का नाही?

Nitesh Rane : कोल्हापुरच्या गादीबद्दलचा नियम सातार्‍याला का नाही?

शिवरायांच्या वंशजांविरोधात सातार्‍यात उमेदवार उभा करुन मविआने अपमानच केला!


संजय राऊतांनी पंतप्रधानांवरुन केलेल्या टीकेवर आमदार नितेश राणे यांचा सणसणीत पलटवार


मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची आज कोल्हापूरमध्ये महायुतीसाठी (Mahayuti) प्रचारसभा आहे. त्यावर ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) 'पंतप्रधानांनी कोल्हापूरच्या गादीचा, छत्रपती घराण्याचा अपमान करु नये. छत्रपती घराण्याच्या विरोधात प्रचार म्हणजे गादीचा अपमान', असं वक्तव्य केलं. यावर भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी संजय राऊतांना चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. 'शिवरायांच्या वंशजांविरोधात सातार्‍यात उमेदवार उभा करुन महाविकास आघाडीने त्यांचा अपमानच केला आहे', अशी सणसणीत टीका नितेश राणे यांनी केली.


नितेश राणे संजय राऊतांना उद्देशून म्हणाले, हाच नियम, हीच भूमिका तुम्ही सातार्‍यात असताना का घेतली नाही? त्या ठिकाणी छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत. ती गादी देखील आमच्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. शिवरायांच्या वंशजांच्या विरोधात तुतारीचा उमेदवार का उभा आहे? जो नियम तुम्हाला कोल्हापुरात लावायचा आहे, तोच नियम तुम्ही सातार्‍यातही लावा, असं नितेश राणे म्हणाले.


देशाचे पंतप्रधान मोदी हे उमेदवाराच्या प्रचारासाठी येत असताना देशासाठी त्यांनी काय केलं आणि कोल्हापूरकरांचं त्यांच्यावर किती प्रेम आहे, हे पाहायचं असेल तर संजय राजाराम राऊतला गर्दीमध्ये मी खुर्ची देऊन बसवतो. मग त्याने आमच्या पंतप्रधान मोदींची जादू बघावी. संजय राऊतने याआधी वंशजांचे पुरावे मागितले होते, त्यामुळे त्याच्या तोंडून आमच्या छत्रपती घराण्याच्या बाजूने काहीही ऐकणं हाच मुळात मोठा अपमान आहे, अशी टीका नितेश राणे यांनी केली. संजय राऊतने आधी माफी मागावी आणि मग छत्रपतींच्या घराण्याबद्दल बोलावं, असंही नितेश राणे म्हणाले.



गुजरातच्या कांद्याची चव मालकाला विचार


गुजरातचा २००० मेट्रिक टन कांदा परदेशात निर्यात करण्यात येणार आहे, मात्र महाराष्ट्राचा कांदा सडवला जातोय, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. यावर नितेश राणे म्हणाले, गुजरातचा कांदा किती गोड आणि चविष्ट आहे हे तू तुझ्या मालकाला विचार. कारण काही आठवड्यांपूर्वी तुझा मालक आणि त्याचं कुटुंब जामनगरला जाऊन कांदाच खाऊन आले आहेत. तेव्हा अंबानींच्या लग्नात गुजरातचा कांदा तुझ्या मालकाला खटकला नाही. म्हणून गुजरातच्या कांद्याची चव मालकाला विचार आणि मग तुझं थोबाड उघड, असं नितेश राणे म्हणाले.


Comments
Add Comment