Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीReady to Eat पदार्थांपासून दूर राहतात भारतीय, बाहेरच्या जेवणाला पसंती

Ready to Eat पदार्थांपासून दूर राहतात भारतीय, बाहेरच्या जेवणाला पसंती

मुंबई: आजकाल रेडी टू ईड फूडचे(ready to eat) कल्चर वाढत आहे. यात अधिक मेहनत न घेतला जेवण बनवता येऊ शकते. याची चव चांगली असते. मात्र बरेच भारतीय अशा पदार्थांपासून दूर राहणे पसंत करतात. त्यांना बाहेर रेस्टॉरंट-हॉटेलमध्ये जाऊन खाणे आवडते मात्र रेडी टू ईट फूड नाही. याचे सगळ्यात मोठे कारण आहे की पॅकेज्ड फूड्समध्ये अनेक प्रिझर्व्हेटिव्ह असतात जे शरीरासाठी नुकसानदायक असते. तर हॉटेल -रेस्टॉरंटमध्ये खाणे तयार असते. रेडी टू ईट फूडचे शरीरावर गंभीर परिणाम होतात.

रेडी टू ईट पदार्थांमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह, आर्टिफिशियल कलर आणि फ्लेवर्स यांचा वापर भरभरून केला जातो. जे आरोग्यासाठी हानिकारक आहे. या पदार्थांची शेल्फ लाईफ वाढवण्यासाठी मीठाचा वापर जास्त केला जातो. यामुळे शरीरात सोडियम वाढते.

पोषणतत्वांचा नाश

रेडी टू ईट पदार्थ खायला टेस्टी लागतात मात्र यात पोषणतत्वांची कमतरता असते. यात फायबर व्हिटामिन्स आणि मिनरल्स यांची कमतरता असते. यामुळे शरीरात कॅलरी जमा व्हायला लागतात.

महाग असतात

रेडी टू ईट पदार्थांची पाकिटे घरी बनवलेल्या खाण्याच्या तुलनेत अतिशय महाग असतात. यामुळे अनेकजण हे खात नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -