Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीMaldives Election Result: मालदीवच्या निवडणुकीत चीन समर्थक मुईज्जू यांचा प्रचंड विजय

Maldives Election Result: मालदीवच्या निवडणुकीत चीन समर्थक मुईज्जू यांचा प्रचंड विजय

नवी दिल्ली: मालदीवच्या(maldives) संसदीय निवडणुकीत मोहम्मद मुईज्जू(mohammad muizzu) यांचा पक्ष पीएनसीला मोठा विजय मिळाला आहे. तर विरोधी पक्ष एमडीपीला निराशा हाती लागली आहे. असे मानले जात आहे मालदीवच्या जनतेने भारताविरोधी भूमिका घेणाऱ्या मुईज्जू यांना पसंती दिली आहे.

९३ जागांच्या मालदीवच्या संसदेत पीएनसीला ६६ जागा मिळाल्या आहेत. तर नुकत्याच झालेल्या महापौर निवडणुकीत मुईज्जू यांच्या पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

रविवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी ८ वाजता संध्याकाळी ५.३० वाजेपर्यंत २०व्या पीपल्स मजलिससाठी मतदान झाले. एकूण ९३ जागांवर मतदान झाले याचत ६६ जागांवर मुईज्जू यांचा पक्ष पीपल्स नॅशनल काँग्रेसने विजय मिळवला आहे. पीएनसीने एकूण ९० जागांवर निवडणूक लढवली होती.

तर मुख्य विरोधी पक्ष मालदीवियन डेमोक्रेटिक पक्षाला १२ जागांवर समाधान मानावे लागले. अशातच आता मालदीवच्या संसदेवर पीएनसी ताबा मिळवला आहे. ८ जागांवर अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला. तर इतर जागांवर अन्य छोट्या पक्षांनी विजय मिळवला आहे.

गेल्या वर्षी मोहम्मद सोलिह यांना हरवत मोहम्मद मुईज्जू मालदीवचे राष्ट्रपती बनले होते. मात्र पीएनसीकडे मालदीवच्या संसदेत बहुमत नव्हते. संसदेत बहुमत नसल्या कारणाने मुईज्जू मालदीवमध्ये मोठा बदल करू शकले नव्हते. निवडणुकीआधी मुईज्जूने देशाच्या जनतेला मालदीवच्या संसदेत बहुमत देण्याचे अपील केले होते. मोहम्मद मुईज्जू यांना चीनचे समर्थक नेते म्हणून पाहिले जात होते. अशातच मुईज्जू यांना मालदीवमध्ये मोठा बदल करायचा आहे ते आता त्यांना सोपे झाले आहे.

दरम्यान, या निवडणुकीचा परिणाम मालदीव आणि भारताच्या नात्यावर पडू शकतो. कारण मुईज्जू राष्ट्रपती बनल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील नाते खराब होऊ शकते. आता संसदेत त्यांचे राज्य आल्यामुळे मालदीवमध्ये चीनला मोठ्या संधी मिळू शकतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -