Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीGoogle doodle : भारताच्या निवडणुकांची दखल घेत आज गुगलचं नवं डुडल

Google doodle : भारताच्या निवडणुकांची दखल घेत आज गुगलचं नवं डुडल

गुगलने दिला मतदानाचा संदेश

मुंबई : विविध दिवसांचं औचित्य साधून गुगल अॅप (Google app) नवनवीन डुडल (Doodle) तयार करत असतं. थोर व्यक्तींची जयंती, पुण्यतिथी, कधी मोठा सण किंवा एखाद्या देशाचं अननय्साधारण यश अशा अनेक गोष्टींना घेऊन गुगल मजेशीर तर कधी संदेश देणारे डुडल्स तयार केले जातात. आज भारतात सार्वत्रिक निवडणुका (Elections) सुरु होत आहेत, त्याची दखल घेत गुगलने नवं डुडल तयार केलं आहे. गुगल अॅप सुरु केल्यानंतर हे डुडल तुम्हाला दिसेल.

भारतात १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत १८ व्या लोकसभेच्या ५४३ सदस्यांची निवड करण्यासाठी सात टप्प्यांत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. ४ जून २०२४ रोजी याचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यानिमित्त आज गुगलचं बोटाला शाई लावलेल्या मतदाराच्या हाताचं डुडल सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ‘मतदान (Voting) करा’ असा संदेश देण्याचा प्रयत्न या डुडलमार्फत करण्यात आला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -