नवी मुंबई(प्रतिनिधी) – सुनियोजित अश्या सिडकोच्या मेट्रो रेल्वे स्टेशनवर पंखे नसल्याने, उन्हाच्या झळांनी मेट्रो रेल्वे प्रवाशांची होणारी गैरसोय दुर करण्यासाठीं मेट्रो रेल्वे स्टेशनवर.पंखे बसविण्यात यावे अशी मागणी पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष कासमभाई मुलाणी’ यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक याच्याकडे केली आहे.
सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्प अतिशय सुनियोजित बनविण्यात आला असून प्रवाशांनी उदंड प्रतिसाद दिलेला आहे या वर्षी उष्णतेचे प्रमाण अधिक असल्याने प्लॅटफॉर्मवर फॅन नसल्याने प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर उभे रहाणे मुश्किल झाले आहे विशेष म्हणजे प्रवाशी प्लॅटफॉर्मवर काही मिनिटेच मेट्रो ची प्रतीक्षा करत असतात त्यामुळे प्रवाशी कशी बशी वेळ काढून जातात.
परंतु प्रवाशाच्या सुरक्षे करिता प्लॅटफॉर्मवर नेमणुकीस असलेले सुरक्षा रक्षक है २४ तास जुटीवर असतात फॅन नसल्याने अधिक उष्णतेचा सामना करावा लागत असल्याने प्लॅटफॉर्मवर मेट्रो आली आसता काही क्षणाकरीता नविलाजास्त्व मेट्रोच्या एसीचा आधार घ्यावा लागत आहे या सर्वाचा आदरणीय महोदयांनी गांभीर्याने विचार करून प्रत्येक मेट्रो स्थानकावर फॅन बसविण्यात येऊन प्रवाशी व सुरक्षा रक्षकांना दिलासा द्यावा असे.कासमभाई मुलाणी’यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक यांच्या कडे केली आहे.