Pawar Vs Pawar : शरद पवारांना मोठा धक्का! कट्टर समर्थक असलेले माने कुटुंब अजित पवारांच्या साथीला

आखणी सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची मात्र आता करणार सुनेत्रा पवारांचा प्रचार


पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (NCP) फूट पडल्यानंतर अनेक जणांनी शरद पवारांची (Sharad Pawar) साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Pawar) साथ द्यायचे ठरवले. लोकसभा निवडणुका (Loksabha Elections) जाहीर झाल्यानंतरही अजितदादांकडे जाणारा नेते व कार्यकर्त्यांचा ओढा कमी होत असून अजित पवार गट अधिकाअधिक बळकट होत चालला आहे. त्यातच आता इंदापूरात शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. कट्टर समर्थक सोनाई डेअरीचे मालक प्रवीण माने (Pravin Mane Sonai) आणि माने कुटुंबियांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना पाठिंबा दिला आहे.


अजित पवार हे विकासासाठी भाजप बरोबर गेले आहेत. आम्ही बारामतीचा विकास व्हावा यासाठी अजित दादा यांच्या बरोबर जात आहे, असं माने कुटुंबियांनी म्हटलं आहे. बारामती लोकसभा मतदार संघ निवडणूक सुरू आहे. माने कुटुंब व पवार कुटुंब कायम सोबत राहिले आहे. अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही त्यांच्या बरोबर राहणार आहोत. महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचारात सक्रिय होवून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही ठामपणे हा निर्णय घेतला आहे. आज पासून प्रचार सुरू करत आहोत, असंही प्रवीण माने म्हणाले आहेत.


बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्यात महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ म्हणून इंदापूरमध्ये आमदार दत्तात्रय भरणे अजित पवारांच्या बाजूला गेल्यानंतर शरद पवारांच्या बाजूने कमी बळ होते. मात्र प्रवीण माने हे शरद पवारांच्या बाजूला असल्याने पुढील विधानसभेचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जायचे. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत इंदापूरमध्ये भाजपचा मेळावा पार पडणार होता, त्यावेळी स्वागताला प्रवीण माने आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. अखेर आज त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. लोकांना राजकारणापेक्षा विकासला महत्व द्यावं वाटतं, त्यामुळे प्रवीण माने आणि कुटुंबियांनी अजित दादा बरोबर येण्याचा निर्णय घेतला आहे, असं प्रदीप गारटकर म्हणाले.



शरद पवारांना मोठा धक्का


प्रवीण माने आणि माने कुटुंब हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. शरद पवार गटाचा पुढील विधानसभेचा चेहरा म्हणून प्रवीण माने यांच्याकडे देखील पाहिलं जायचं. त्यांनी सुप्रिया सुळेंच्या (Supriya Sule) प्रचाराची आखणीदेखील केली आणि प्रचारासाठी मैदानात देखील उतरले होते. मात्र आता ते सुनेत्रा पवारांचा प्रचार करताना दिसणार आहे.

Comments
Add Comment

नेमक्या कोणत्या कारणामुळे पार्थ पवारांच्या अडचणी वाढल्या ?

पुणे : कोरेगाव पार्क परिसरातील महार वतनाच्या तब्बल ४० एकर जमिनीच्या नोंदणी प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर

पुणेकरांनो नव्या घराचं स्वप्न होणार पूर्ण; म्हाडाच्या ४,१८६ घरांसाठी अर्ज करण्याची मुदत आता ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढवली

पुणे : पुणे महानगर प्रदेशात घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी म्हाडाने (MHADA) मोठा दिलासा दिला आहे. विविध

मालेगावच्या बालिकेवर अत्याचार, सर्वत्र संताप; अभिनेत्री सुरभी भावेकडून कठोर शिक्षेची मागणी

मालेगाव : मालेगावजवळील डोंगराळे गावात घडलेल्या निर्घृण घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. साडेतीन

राज्यभरातील व्यापाऱ्यांचा ५ डिसेंबरला लाक्षणिक बंद

पुणे (प्रतिनिधी) : राज्यभरातील व्यापारी विविध मागण्यांकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ५ डिसेंबर २०२५ रोजी

धक्कादायक प्रकार, पुण्यात १६ जेष्ठ नागरिकांना उघड्यावर टाकले

पुणे : पुण्यातील सामाजिक सुरक्षेच्या यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. शहरातील १६

ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड संस्थेत घोटाळा! सर्वसामान्यांच्या बचतीचा पदाधिकाऱ्यांनी घेतला फायदा

अकोला: अकोल्यातली ताकझुरे अर्बन निधी लिमिटेड या संस्थेमध्ये ठेवी केलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक