इंधनावर नेमका किती कर; जाणून घ्या सविस्तर
मुंबई : आजपासून आर्थिक वर्षाला सुरवात झाली आहे. नव्या आर्थिक वर्षापासून एलपीजी गॅस सिलेंडरचे दर, टॅक्स नियमात बदल, फास्टॅग यांसारख्या नियमात बदल लागू केले आहेत. काही गोष्टींमुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळला आहे तर काही गोष्टींत महागाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किचिंत बदल झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसून येतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात २ रुपयांनी कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला होता. मात्र सरकारी कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या नव्या किंमती जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आहे. महाराष्ट्रात पेट्रोल ६५ पैशांनी तर डिझेल ६३ पैशांनी महाग झाले आहे. तर मध्य प्रदेशात पेट्रोल ३१ पैसे तर डिझेल २८ पैशांनी महागले आहे. हिमाचल प्रदेशात पेट्रोल २३ पैसे तर डिझेल २२ पैशांनी महागले आहे.
जाणून घ्या महाराष्ट्र आणि देशाच्या मुख्य शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर
- आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोल दर प्रतिलिटर १०४.२१ रुपये तर डिझेलचा दर ९२.१५ रुपये प्रति लिटरने विकले जाणार आहे.
- पुण्यात पेट्रोलचा दर १०३.८३ रुपये तर डिझेलचा दर ९०.३७ रुपये आहे.
- नाशिकमध्ये पेट्रोल १०४.९१ रुपये प्रतिलिटरने विकले जात आहे. डिझेलचे दर ९१ ते ४१ रुपये प्रति लिटर आहे.
- नागपुरात पेट्रोलचा दर १०३.९८ रुपये तर डिझेलचा दर ९०.५४ रुपये प्रतिलिटर आहे.
- छत्रपती संभाजीनगरात पेट्रोल १०६ ते ७८ रुपयांना विकले गेले असते. डिझेल ९०.५४ रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.
- नवी दिल्लीत पेट्रोलचा दर ९४.७२ रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलचा दर ८७.६२ रुपये आहे.
- कोलकात्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०३.९४ रुपये आणि डिझेलचा दर ९०.७६ रुपये आहे.
- चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर १००.७५ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ९२.३४ रुपये प्रति लिटर आहे.