Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीBihar Accident : पंचायत फेम अभिनेत्री आँचल तिवारीसह ९ भोजपुरी कलाकारांचा अपघातात...

Bihar Accident : पंचायत फेम अभिनेत्री आँचल तिवारीसह ९ भोजपुरी कलाकारांचा अपघातात मृत्यू

बिहारमधील भीषण अपघात

पाटणा : बिहारमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. काल संध्याकाळच्या सुमारास बिहारच्या कैमूर जिल्ह्यात ट्रक, एसयूव्ही आणि मोटारसायकल यांची टक्कर होऊन भीषण अपघात (Bihar Accident) झाला. या अपघातात पंचायत (Panchayat) फेम अभिनेत्री आँचल तिवारीसह (Anchal Tiwari) काही प्रसिद्ध भोजपुरी कलाकारांचा (Bhojpuri Artists) मृत्यू झाला आहे. या कलाकारांच्या मृत्यूनंतर भोजपूरी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिलांसह आठ लोक एका एसयूव्ही गाडीमधून प्रवास करत होते. यावेळी या गाडीला एक दुचाकी धडकली. यानंतर,एसयूव्ही आणि दुचाकी रस्त्याच्या दुसऱ्या लेनमध्ये गेले, तेथे एका भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीच्या चालकासह नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून पळून गेला.

या घटनेनंतर त्या मार्गावर ट्रॅफिक जाम झाले. ताबडतोब पोलीस घटनास्थळी पोहोचले. सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी भभुवा येथील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पोस्टमॉर्टमनंतर पोलिसांनी मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना माहिती दिली आहे.

विमलेश पांडे उर्फ छोटू पांडे या भोजपुरी गायकाचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. त्यासह आँचल तिवारी, सिमरन श्रीवास्तव, प्रकाश राम, दधिबल सिंह, अनु पांडे, शशि पांडे, सत्य प्रकाश मिश्रा आणि बागीश पांडे यांचा या अपघातात मृत्यू झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -