२० गुन्ह्यांच्या शिक्षेतही करण्यात आला बदल
नवी दिल्ली : केंद्र सरकारने (Central Government) ब्रिटिशकालीन महत्त्वाच्या तीन कायद्यांमध्ये बदल करुन नवे फौजदारी कायदे (Criminal laws) लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी नव्या कायद्यांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे व १ जुलैपासून नवे फौजदारी कायदे लागू करण्यात येणार आहेत. सोबतच २० नव्या गुन्ह्यांमध्ये आणि त्याच्या शिक्षेतही बदल करण्यात आला आहे.
डिसेंबर २०२३ मध्ये लोकसभेने पारित केलेले भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे अनुक्रमे भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा यांऐवजी १ जुलै २०२४ पासून लागू होतील, अशी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
न्यायसंहितेत २० गुन्ह्यांच्या शिक्षेत बदल
सामूहिक बलात्कारात दोषी आढळल्यास २० वर्षांचा कारावास किंवा दोषी जिवंत असेपर्यंत तुरुंगवास अशी शिक्षा देण्यात येईल. १८ वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास जन्मठेप आणि फाशीची शिक्षा देण्यात येईल. तसेच खुनाचे कलम ३०२ आता १०१ करण्यात आलं आहे.