Chandrashekhar Bawankule : सिंधी विस्थापितांना दिलासा, ‘विशेष अभय योजने’ला मुदतवाढ
MUMBAI : राज्यातील सिंधी विस्थापितांच्या निवासी आणि व्यावसायिक मालमत्तांचे फ्री-होल्ड (मुक्तहस्त) करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘विशेष अभय ...
तीन तासांची मॅरेथॉन बैठक; सर्व घटकांची मते जाणून घेत ऐतिहासिक निर्णय
वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेसंदर्भात विविध सामाजिक, कायदेशीर आणि तांत्रिक मुद्द्यांवरून निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत संबंधित दोन्ही बाजूंचे प्रतिनिधी, स्थानिक घटक, सामाजिक संघटना तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान मंत्री शिरसाठ यांनी सर्व संबंधितांचे मत, भावना आणि भूमिका अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या. “वाद कायम ठेवण्यापेक्षा या जागेचा समाजहितासाठी, राज्यहितासाठी आणि भावी पिढ्यांच्या दृष्टीने सकारात्मक वापर व्हावा,” यावर अखेर सर्वानुमते शिक्कामोर्तब करण्यात आले.
Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी घसरण , ग्राहकांना दिलासा; जळगावच्या सराफ बाजारात आजचे दर किती ?
Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढउतार पहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागल्याचं चित्र आहे. अशातच ...
३० एकर जागेवर उभारणार आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल
बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या जागेच्या सामाजिक आणि ऐतिहासिक महत्त्वाचा विचार करून येथे भव्य आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध संकुल उभारून या प्रश्नावर तोडगा काढावा, असे सुचवले होते. त्यानुसार शासनाने वालधुनी येथील सुमारे ३० एकर जागेवर ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या संकुलामध्ये भव्य बुद्ध विहार, बौद्ध मठ, स्तूप, ध्यान केंद्र, अत्याधुनिक विपश्यना केंद्र उभारण्यात येणार असून, हे संकुल केवळ धार्मिक स्थळ न राहता जागतिक दर्जाचे ज्ञान, संस्कृती आणि संशोधनाचे केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार आहे. याशिवाय येथे आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शाळा, महाविद्यालय, जागतिक दर्जाचे ग्रंथालय, बौद्ध सांस्कृतिक संग्रहालय, डिजिटल रिसर्च सेंटर तसेच अभ्यासिका आणि प्रशिक्षण केंद्रेही उभारण्यात येणार आहेत.
Ashish Shelar : रत्नागिरी-सिंधुदुर्गातील मोबाईल कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी सात दिवसांत अहवाल तयार करा
मंत्री आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश मुंबई : रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क व इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या गंभीर ...






