Friday, July 19, 2024
Homeक्राईमShiv Thakare : बिग बॉस फेम शिव ठाकरेला ईडीची नोटीस; काय आहे...

Shiv Thakare : बिग बॉस फेम शिव ठाकरेला ईडीची नोटीस; काय आहे प्रकरण?

मुंबई : आपल्या हटके स्टाईल अन् स्वॅगसाठी ओळखल्या जाणाऱ्या आणि बिग बॉस (Bigg Boss) व खतरों के खिलाडी (Khatron ke Khiladi) या रिअॅलिटी शोजमधून (Reality Shows) प्रसिद्धी मिळालेल्या शिव ठाकरेला (Shiv Thakare) आगामी काळात मोठ्या अडचणीला सामोरं जावे लागणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचं कारण त्याला पाठविण्यात आलेलं ईडीचं समन्स.

मनीलॉन्ड्रिंग (Money Laundering) प्रकरणात शिव ठाकरेला ईडीकडून नोटीस (ED Notice) पाठवण्यात आली आहे. त्याच्यासह अब्दू रोझिकचंही (Abdu Rozhik) नाव त्या यादीत असल्याचं समोर आलं आहे.

हे प्रकरण सध्या जेलमध्ये असणाऱ्या ड्रग माफिया अली असगर शिराजीशी (Ali Asgar Shiraji) संबंधित आहे. त्यावरुन अब्दू आणि शिवला नोटीस पाठविण्यात आली असून त्यांची चौकशीही झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणामध्ये शिव आणि अब्दूची कोणतीही महत्वाची भूमिका नाही. त्यांना केवळ हायप्रोफाईल मनी लॉड्रिंग केस असल्याने चौकशी आणि साक्षीसाठी बोलविण्यात आले होते. त्यांची चौकशी झाल्यानंतर त्यांची साक्ष नोंदवून घेण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -