रांची: झारखंडचे(Jharkhand) माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन(hemant soren) यांना एक दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. याआधी हेमंत सोरेन यांना रिमांडवर घेण्यावबाबत ईडीच्या मागणीवरून कोर्टात वाद झाला. कोर्टाने वादानंतर हेमंत सोरेन यांना एक दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे.
न्यायालयाने संध्याकाळी सव्वा चारच्या सुमारास माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना एक दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर हेमंत सोरेन यांना रांची येथील होटवार न्यायालयात पाठवण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हेमंत सोरेन होटवार जेलच्या अप्पर डिव्हीजन सेलमध्ये ठेवले जाईल. उद्या म्हणजेच शुक्रवारी पुन्हा पोलीस कोठडीसाटी कोर्टात वाद होईल. याआधी गुरूवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हेमंत सोरेन ईडीच्या विशेष न्यायालयात पोहोचले. यानंतर सुनावणी सुरू झाली. दोन्ही पक्षांकडून साधारण २ तास आपली बाजू मांडण्यात आली. या दरम्यान दोन्ही पक्षकारांमध्ये जोरदार वाद झाला.
ईडीने कोर्टाकडे १० दिवसांची रिमांड मागितली होती. कोर्टात बचाव पक्षाकडून जोरदार वाद करण्यात करण्यात आला. यानंतर कोर्टाने हेमंत सोरेन यांना रिमांडमध्ये पाठवण्याचा निर्णय सुरक्षित ठेवला. दुसरीकडे झारखंडमध्ये सुरू असलेल्या राजकीय भूकंपादरम्यान चंपाई सोरेन यांनी राज्यपालांना पत्र लिहिले आहे.