मुंबई (विशेष प्रतिनिधी) : डॉ. ई. मोझेस मार्गावरील फेमस स्टुडिओसमोर असलेल्या १६५० मिलिमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला तडा जाऊन मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत असल्याचे बुधवारी ६ मे २०२६ रात्री आढळून आले आहे. या जलवाहिनी दुरुस्तीचे काम बुधवारी ६ मे २०२६ रोजी रात्री १० वाजेपासून युद्धपातळीवर सुरू आहे. दुरुस्तीच्या कामाचे स्वरूप मोठे असल्याने गुरूवारी ७ मे २०२६ रोजी ही कामे सुरूच आहेत. परिणामी, ‘डी’, ‘ई’ आणि ‘जी दक्षिण’ विभागांतील काही भागांचा पाणीपुरवठा शुक्रवार, ८ मे २०२६ पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे तर काही भागांना कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येईल. संबंधित विभागातील नागरिकांनी या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन सहकार्य करावे, अशी आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणारा परिसर
- डी विभाग: लॅमिंग्टन रोड, एम. एस. अली रोड, जे. बोमन बेहराम मार्ग, आर. एस. निमकर मार्ग, शुक्लाजी स्ट्रीट, ग्रँट रोड (पूर्व), बालाराम स्ट्रीट, डॉ. डी. बी. मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, फालकलॅड रोड, पश्चिम रेल्वे, मुंबई सेंट्रल स्थानक ( ८ मे २०२६ रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहील), ठाकूरद्वार, एम. के. रोड, आर. आर. रोड, जे. एस. एस. रोड, खाडिलकर रोड, गिरगाव रोड, ह्यूजेस रोड, बाबुलनाथ रोड, चौपाटी रोड, एम. पी. मिल्स कंपाऊंड, बी. बी. नकाशे मार्ग, ताडदेव, आंबेडकर नगर वसाहत, केशवराव खाड्ये मार्ग (दक्षिण)
- ई विभाग : एम.एस.अली मार्ग, बेलासीस मार्ग, कामाठीपुरा, शंकरराव पुपला मार्ग, शुक्लाली स्ट्रीट, मानाजी राजुजी मार्ग, मोरलॅड मार्ग, आग्रीपाडा मार्ग, सातरस्ता जंक्शन, बी. जे. मार्ग, साने गुरुजी मार्ग, एम.ए. मार्ग, डॉ. आनंदराव नायर मार्ग, नायर रूग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, जगजीवन राम रूग्णालय, वॉक्हार्ड रूग्णालय
- जी दक्षिण विभाग : सातरस्ता परिसर, जे. आर. बोरीचा मार्ग, साने गुरुजी मार्ग, केशवराव खाड्ये मार्ग, धोबीघाट, जी.बी सपकाळ मार्ग, डॉ. ई. मोझोसमधील काही परिसर






