Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीTMKOC : मालिकेत पुन्हा ओरिजनल 'दयाबेन' दिसणार नाही!

TMKOC : मालिकेत पुन्हा ओरिजनल ‘दयाबेन’ दिसणार नाही!

‘तारक मेहता का उलटा चष्मा’चे चाहते झाले नाराज

मुंबई : ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta ka Ooltah chashmah) ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. यातील पात्रांमुळे आणि त्यातील विनोदी शैलीमुळे प्रेक्षकांना ही मालिका अत्यंत जवळची वाटते. यातील जेठालाल आणि दयाबेनची (Jethalal and Dayaben) जोडी प्रेक्षकांना विशेष आवडते. मात्र, या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक नाराजीची बातमी समोर आली आहे. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी (Disha Vakani) यापुढे मालिकेत काम करणार नाही आहे. मालिकेच्या निर्मात्यांनीच ही माहिती दिली आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत दिशा वकानीची एन्ट्री होणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. दिशाची एन्ट्री होणार असल्याचे प्रोमो आऊट करण्यात आले. पण काही ना काही कारणाने दयाबेनच्या भूमिकेत दिशा दिसलेली नाही. त्यामुळे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेचे प्रेक्षक नाराज झाले. ते ही मालिका बॉयकॉट करण्याची मागणी करत होते.

अखेर एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी याबाबत खुलासा केला आहे. ते म्हणाले की,”दिशासोबत माझं बोलणं झालं. पुन्हा कमबॅक करण्यासाठी तिने होकार दिला होता. पण शेवटच्या क्षणी तिचा निर्णय बदलला. त्यामुळे मालिकेत तिची एन्ट्री झाली नाही. दिशाचं कुटुंब आहे. तिला दोन लहान मुलं आहेत. तिच्या वैयक्तिक आयुष्याचाही आदर करायला हवा”.

असित मोदी पुढे म्हणाले, “नव्या दयाबेनचा शोध सुरू आहे. ऑडिशन सुरू आहे. जेव्हा दयाबेनच्या भूमिकेसाठी एखाद्या अभिनेत्रीची निवड होईल तेव्हा चाहत्यांसोबत नक्कीच ही आनंदाची बातमी शेअर केली जाईल. खरं तर दिशाने आमच्यासोबत पुन्हा काम करावं, अशी आमची इच्छा आहे. दिशाने कमाल काम केलं आहे. तिच्यापेक्षा अधिक चांगलं काम करणारं अद्याप आम्हाला कोणी सापडलेलं नाही”, असं त्यांनी सांगितलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -