मुंबई: देशातील सगळ्यात मोठे उद्योगपतींपैकी एक आणि टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटाही(ratan tata) डीपफेकचे(deepfake) बळी ठरले. बुधवारी टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी त्यांच्या नावाचा वापर करून १०० टक्के रिटर्नची गॅरंटी देणाऱ्या गुंतवणुकीबाबतचा शेअर केलेला व्हिडिओ फेक असल्याचे सांगितले आहे.
रतन टाटाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले सत्य
रतन टाटाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लावलेल्या स्टोरीमध्ये इन्स्टाग्राम युजर सोना अग्रवालच्या पोस्टवर टीका केली. रतन टाटा यांनी हा व्हिडिओ आणि त्याच्या खाली लिहिलेल्या मेसेजच्या स्क्रीनशॉटवर फेक असे लिहित ते आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहे.
रतन टाटा यांच्या फेक इंटरव्ह्यूचा केला वापर
सोना अग्रवाल नावाच्या एका इन्स्टा युजरने खोटा व्हिडिओ पोस्ट केला यात रतन टाटा सोना अग्रवालला आपले मॅनेजर असल्याचे सांगत आहे. रिस्क फ्री सांगताना या गुंतवणुकीची शिफार करणाऱ्या व्हिडिओमध्ये रतन टाटा यांच्या खोट्या इंटरव्ह्यूचा वापर करण्यात आला आहे.
इन्स्टा युझरने केला होता खोटा दावा
शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओसोबत लिहिले होते की भारतात सर्वांसाठी रतन टाटा यांची एक शिफारस. तुमच्याकडे १०० टक्के गॅरंटीसोबत रिस्क फ्री होऊन आजच आपली गुंतवणूक वाढवण्याची संधी आहे. यासाठी आताच चॅनेलवर जा.