Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीचालो नाचो! सलमानने ममता बॅनर्जींना नाचवले!

चालो नाचो! सलमानने ममता बॅनर्जींना नाचवले!

कोलकाता : कोलकाता (Kolkata) येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival) सुरू आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) देखील उपस्थित राहिल्या होत्या. या चित्रपट महोत्सवाला अनेक बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. यात सलमान खान, (Salman Khan) अनिल कपूर, (Anil Kapoor) महेश भट्ट, शत्रुघ्न सिन्हा, सोनाक्षी सिन्हासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये सलमान खानने या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून केली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी ‘बांग्लार माटी बांग्लार जल’ हे गाणे गायले. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ममता बॅनर्जी या सलमान खान आणि महेश भट्ट यांच्यासोबत नाचताना दिसत आहेत. या व्हिडिओत अनिल कपूर, सोनाक्षी आणि शत्रुघ्न सिन्हा देखील स्टेजवर दिसत आहेत. तर सौरव गांगुली देखील शेजारी टाळ्या वाजवताना दिसत आहे.

ममता बॅनर्जींचा हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहते त्याला भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -