Pune accident : पुण्यात भरधाव एसटीची सात वाहनांना धडक

  128

दोन कारसह पाच दुचाकींचे नुकसान


पुणे : पुण्यात फातिमा नगर (Pune Fatima Nagar Accident) भागात भीषण अपघात घडला आहे. सांगोला येथून पुण्यातील स्वारगेट एसटी स्टँडकडे जाणार्‍या एसटी बसने सात वाहनांना उडवले असून अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. धडक बसलेल्या वाहनांमध्ये दोन कारसह पाच दुचाकींचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी एसटी बसचालकाला (ST Bus driver) ताब्यात घेतले आहे.


कायमच वर्दळ आणि वाहतूक कोंडी असणार्‍या फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक दिली. यात कारचा चक्काचूर झाल्याने मोठे नुकसान झाले. अपघाताच्या वेळी बसमध्ये ३० प्रवासी होते.


या अपघातात मोटारीतील आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर, अन्य सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती.


दरम्यान, पोलिसांनी एसटी बसचालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगोला) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Comments
Add Comment

मनोज जरांगे असलेल्या लिफ्टचा अपघात, लिफ्ट जमिनीवर कोसळली

बीड : मराठा नेते मनोज जरांगे पाटील ज्या लिफ्टमध्य होते त्या लिफ्टचा अपघात झाला. लिफ्ट जमिनीवर धाडकन कोसळली. मनोज

‘सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय?’

अकोला : काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्य आणि हाती सिगारेट घेतलेला व्हिडीओ व्हायरल झाल्याने चर्चेत असलेल्या

MSBTE च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! निकाल रोखून ठेवलेल्या, अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्याची संधी - लोढा

मुंबई: महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ या सत्रातील एक वर्ष कालावधी अभ्यासक्रमाच्या निकाल

श्री तुळजाभवानी मंदिरातील तलवार चोरीच्या बातम्या खोट्या, अफवांवर विश्वास ठेवू नका!

धाराशिव : श्री तुळजाभवानी मंदिरात सध्या जतन,संवर्धन व विविध विकासकामे मोठ्या प्रमाणावर सुरू असून,या अनुषंगाने

Daund Yawat Tension: ५०० जणांविरुद्ध गुन्हा दाखल, १७ जणांना अटक, कलम १६३ लागू...

पुण्यातील जातीय हिंसाचारावर कारवाई पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यामधील यवत गावात शुक्रवारी एका सोशल मीडिया

महाराष्ट्रात ४.१७ कोटींची बेनामी मालमत्ता उघड!

मुंबई : महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) यावर्षी भ्रष्ट लोकसेवक आणि खाजगी व्यक्तींविरुद्ध चार