मुंबई: पर्सनल लोनवर(personal loan) होम लोन, कार लोन, गोल्ड लोनसारख्या दुसऱ्या कर्जाच्या तुलनेत सर्वाधिक व्याजदर असते. यामुळेच जेव्हा कधी दुसरा पर्याय नसतो तेव्हाच पर्सनल लोन घेतले पाहिजे. कारण यावर सर्वाधिक व्याजदर असते. पर्सनल लोन घेण्याआधी ग्राहकांना विविध बँकांकडून दिल्या जाणाऱ्या ऑफर्सवर जरूर विचार केला पाहिजे. जिथे कमी व्याजदर असतो तिथूनच पर्सनल लोन घेतले पाहिजे.
बँक ऑफ महाराष्ट्र पर्सनल लोन रेट
बँक ऑफ महाराष्ट्र २० लाख रूपयांपर्यंत पर्सनल लोनवर १० टक्के अथवा त्याहून अधिक व्याजदर देत आहे. यात कालावधी८४ महिन्यांपर्यंत असेल.
पंजाब अँड सिंध बँक पर्सनल लोन रेट
पंजाब अँड सिंध बँक ३ लाख रूपयांपर्यंत पर्सनल लोनवर १०.१५ टक्के ते १२.८० टक्क्यांपर्यंत व्याजदर देत आहेत. येथे कालावधी १२ ते ६० महिन्यांपर्यंत आहे.
इंडसलंड बँक पर्सनल लोन रेट
इंडसलंड बँक ३० हजार अधवा त्याहून अधिक २५ लाख रूपयांपर्यंतच्या लोनवर १०.२५ टक्के ते ३२.०३ टक्क्यांपर्यंत ऑफर करत आहे. हा कालावधी १२ ते ६० महिन्यांपर्यंत आहे.
बँक ऑफ बडोदा पर्सनल लोन रेट
बँक ऑफ बडोदा ५० हजार रूपयांपासून ते २० लाखांपर्यंत पर्सनल लोनवर १०.३५ टक्के ते १७.५० टक्क्यांपर्यंत व्याजदर ऑफर करत आहेत. हा कालावधी ४८ ते ६० महिने आहे.