मुंबई: मुंबईच्या वांद्रे-वरळी सी लिंकवरील(bandra worli sea link) टोल प्लाझावर गुरुवारी रात्री मोठा अपघात(accident) घडला. या ठिकाणी एका वेगवान कारने ६ गाड्यांना टक्कर दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. गुरूवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. सी लिंकवरील टोल प्लाझापासून १०० मीटर अंतरावर हे घडले.
रात्रीच्या वेळेस वांद्रेच्या दिशेने जाणारी एक अत्यंत वेगवान कारची अनेक गाड्यांना धडक बसल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले. सुरूवातीला धडक बसल्यानंतर कारचा वेग अधिक वाढला आणि तिने प्लाझावर उभ्या असलेल्या गाड्यांना टक्कर दिली.
#WATCH | Maharashtra | Around 12 people injured after a speeding car collided with a total of 6 vehicles parked at the toll plaza in the Bandra direction. The speeding car was coming from Worli towards Bandra. 3 of the injured are in serious condition: Mumbai Police
(Warning:… pic.twitter.com/3ijVwEls71
— ANI (@ANI) November 9, 2023
गुरूवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास एक इनोव्हा गाडी वरळी येथून वांद्रेच्या दिशेने नॉर्थ बाऊंडला जात होते. तेव्हा टोल प्लाझावर १०० मीटर अंतरावर तिने गाड्यांना धडक दिली. सी लिंकवरील मर्सिडिज गाडीला डॅश मारल्यानंतर या गाडीने वेग वाढवला आणि लवकर निघून जाण्याच्या घाईत आणखी काही गाड्यांना धडक मारली.
इनोव्हा गाडीत ड्रायव्हरसह सात लोक बसले होते. या संपूर्ण घटनेत मर्सिडीज आणि टक्कर मारणारी गाडी इनोव्हासह ६ वाहनांचा अपघात झाला. यात ९ जण जखमी झाले. ज्यात ३ जणांची प्रकृती गंभीर होती. त्या तीन जणांचा मृत्यू झाला आहे. यात २ महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. बाकी ८ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील २ जणांची प्रकृती अजूनही गंभीर आहे. या दोघांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर बाकी लोकांवर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धडक देणाऱ्या इनोव्हाच्या ड्रायव्हरवरही भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही घटना अतिशय गंभीर आणि यावर कारवाई केली जाईल.