IAF's Sukhoi Su-30MKI Lands Navi Mumbai Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुखोई Su-30MKI चे ऐतिहासिक लँडिंग; हवाई दलाची मोठी झेप, व्हिडिओ व्हायरल
नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या (Navi Mumbai International Airport) विकासातील आणि भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्णक्षण ...
मुख्यमंत्र्यांनी 'X' वरून दिली महत्त्वपूर्ण माहिती
या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी त्यांच्या अधिकृत 'X' सोशल मीडिया हँडलवरून या बैठकीचे फोटो शेअर करत महाराष्ट्रातील जनतेला ही आनंदाची बातमी दिली. मुख्यमंत्र्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "मुंबईतील शासकीय निवासस्थानी आयकीया इंडियाचे सीईओ पॅट्रिक अँटोनी यांची भेट घेऊन विविध विषयांवर संवाद साधताना अत्यंत आनंद झाला. आमची ही चर्चा प्रामुख्याने 'आयकीया'च्या महाराष्ट्रातील व्यवसाय विस्तार आणि नव्या मोठ्या गुंतवणुकीच्या योजनांवर केंद्रित होती. विशेष बाब म्हणजे, ही कंपनी महाराष्ट्रातील स्थानिक कारागीर आणि हस्तकला उद्योगांना सोबत घेऊन काम करत आहे, त्यांच्या या कौतुकास्पद प्रयत्नांचे मी मनापासून स्वागत करतो." मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून आगामी काळात राज्यातील हजारो तरुणांना थेट आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.'IKEA'चा भारतातील थक्क करणारा प्रवास
परवडणाऱ्या किमतीत, आधुनिक डिझाईन आणि अत्यंत दर्जेदार होम फर्निचर तसेच लाइफस्टाइल उत्पादनांसाठी जगभरात 'आयकेईए'चे मोठे नाव आहे. कंपनीने ९ ऑगस्ट २०१८ रोजी हैदराबादमधील हायटेक सिटी परिसरात आपले भारतातील पहिले स्टोअर सुरू करून भारतीय बाजारपेठेत पाऊल ठेवले होते. या पहिल्याच स्टोअरला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर कंपनीने आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवला. डिसेंबर २०२० मध्ये नवी मुंबईत कंपनीचे दुसरे आणि महाराष्ट्रातील पहिले अवाढव्य स्टोअर सुरू झाले. त्यानंतर मुंबईकरांच्या पसंतीस उतरत कंपनीने वरळी येथे आपले विशेष 'सिटी स्टोअर' सुरू केले. पुढे २२ जून २०२२ रोजी बंगळुरूत चौथे, तर नुकतेच मार्च २०२६ मध्ये पुण्यात पाचवे भव्य स्टोअर सुरू करून कंपनीने आपला विस्तार वेगाने वाढवला आहे.It was a pleasure to meet and interact with the CEO of IKEA India, Patrik Antoni, at my official residence in Mumbai today. Our discussion centred on IKEA's ongoing expansion in Maharashtra and plans for large-scale investment. Appreciated the company's efforts in collaborating… pic.twitter.com/9vqttmGuaN
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 4, 2026






