Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीKatrina Kaif : कैटरीनाने मोडला व्हॉट्सॲप चॅनलचा रेकॉर्ड!

Katrina Kaif : कैटरीनाने मोडला व्हॉट्सॲप चॅनलचा रेकॉर्ड!

कॅटरिना कैफ सर्वाधिक फॉलोअर्स असलेली सेलिब्रिटी ठरली

मुंबई : बॉलिवूड स्टार कैटरीना कैफने (Katrina Kaif) व्हॉट्सॲप चॅनलवर (WhatsApp channel) एक उल्लेखनीय टप्पा गाठला असून १४ दशलक्ष फॉलोअर्ससह ही अभिनेत्री सर्वाधिक फॉलो केली जाणारी सेलिब्रिटी ठरली आहे.

व्हॉट्सॲपच्या कंपनीचे मालक मार्क झुकरबर्ग आणि गायक/रॅपर बॅड बनी यासारख्या जागतिक व्यक्तींना मागे टाकत ही खास कामगिरी तिने केली आहे.

बॉलीवूडमध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या कैटरीना कैफने केवळ तिच्या अभिनयाने लाखो लोकांची मने जिंकली नाहीत तर तिच्या यशस्वी ब्रँड के ब्युटीसह उद्योजकतेमध्येही पाऊल टाकले आहे.

तिची बहुआयामी प्रतिभा आणि तिच्या चाहत्यांशी असलेला खरा संबंध याने तिच्या डिजिटल यशात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की हे यश केवळ संख्येच्या पलीकडे आहे.

सोशल मीडियाच्या युगात त्यांच्या चाहत्यांशी थेट संपर्क साधण्याच्या हा एक अनोखा प्लॅटफॉर्म आहे. कैटरीना ही ब्रँड्समध्ये प्रसिद्ध झाली असून अलीकडेच कतार एअरवेजशी त्यांची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून हातमिळवणी केली आहे आणि जपानी फॅशन ब्रँड UNIQLO ची ती पहिली भारतीय महिला ठरली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -