Tuesday, April 29, 2025

देशमहत्वाची बातमी

Rinku Dugga: कुत्र्यासाठी स्टेडियम खाली करणाऱ्या आएएस अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती

Rinku Dugga: कुत्र्यासाठी स्टेडियम खाली करणाऱ्या आएएस अधिकाऱ्याला सक्तीची निवृत्ती

नवी दिल्ली: आपला कुत्रा फिरवण्यासाठी संपूर्ण स्टेडियम(stadium) रिकामी करणाऱे आयएएस अधिकारी रिंकू दुग्गावर(rinku dugga) सरकारने कारवाई केली आहे. या अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली आहे. या त्याच रिंकू दुग्गा आहेत ज्यांनी आपले पती आणि आयएएस संजीव खिरवारसोबत दिल्लीत पोस्टिंगदरम्यान कुत्र्याला फिरवण्यासाठी त्यागराज स्टेडियम खाली केले होते.

२०२२मध्ये त्यांचा आणि त्यांच्या पतीचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यात ती आयएएस दाम्पत्य दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये आपल्या कुत्र्यासह दिसली होती. त्यांच्यावर आरोप होता की त्यांनी आपल्या कुत्र्यासाठी संपूर्ण स्टेडियम खाली केले होते.

सगळे आरोप सिद्ध

ही मार्च २०२२ची गोष्ट आहे. त्यावेळेस आयएएस दाम्पत्य रिंकू दुग्गा आणि त्यांचे पती दिल्लीत पोस्टेड होते. त्यानंतर त्यांचा एक फोटो आला यात दोघेही आपल्या कुत्र्यासह दिल्लीच्या त्यागराज स्टेडियममध्ये फिरताना दिसले होते.

स्टेडियमच्या कर्मचाऱ्यांनी आरोप केला होता की पूर्ण ग्राऊंड त्यांना खाली करण्यास सांगितले होते. यामुळे संजीव आणि त्यांची पत्नी तेथे कुत्र्यासह फिरू शकेल. यामुळे ट्रेनिंग आणि सराव रूटीनमध्ये अडचणी येत होत्या. संजीव आणि त्यांच्या पत्नीवर केलेले आरोप योग्य आढळले होते.

Comments
Add Comment