७ मार्गिकांसाठी ७ टीम लीडर, मेट्रो प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक निर्णय
टीम लीडर्सच्या माध्यमातून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचे महानगर आयुक्तांचे धोरण
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांचे जीवनमान सुधारण्याच्या दृष्टीकोनातून एमएमआरडीए (MMRDA) नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मुंबई महानगर प्रदेशात प्राधिकरणामार्फत (Mumbai Metropolitan Region Development Authority) मेट्रोचे जाळे विकसित करण्यात येत असून सध्यस्थितीत अनेक मेट्रो प्रकल्प मुंबई शहर आणि उपनगरात प्रगतीपथावर आहेत. (MMRDA Empowers Metro Development with Strategic Team Leaders to Ensure Timely Completion)
या मेट्रो प्रकल्पांचे काम आणखीन जलदगतीने पूर्ण करून शहरात सक्षम अशी वाहतूक व्यवस्था लवकरात लवकर निर्माण करण्यात येणार आहे. ही वाहतूक व्यवस्था नियोजित वेळेत विकसित व्हावी यासाठी महानगर आयुक्तांनी आता प्रत्येक मेट्रो मार्गिकेसाठी त्यासोबतच मेट्रो भवनासाठी टीम लीडर्सची नियुक्ती केली आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकल्पांचे पर्यवेक्षण टीम लीडर्सच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात एमएमआरडीएच्या माध्यमातून निर्माणाधिन असलेल्या ७ मेट्रो प्रकल्पांचे काम जलदगतीने आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी हा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.
मेट्रो मार्गिकांच्या बांधकामाला गती देण्यासाठी टीम लीडर्सची भूमिका ठरणार धोरणात्मक
मुंबई महानगर प्रदेश हे लोकसंख्या वाढीचा सर्वाधिक दर असलेले सर्वात मोठे महानगर असून, सध्या ७ मेट्रो मार्गिका निर्माणाधीन असून, ते वेळेत पूर्ण करण्यासाठी धोरणात्मक योजनेची आवश्यकता आहे. नियुक्त केलेले टीम लीडर त्यासंदर्भातील योजना आखून, महानगर आयुक्तांच्या सल्ल्यानुसार गुणवत्तेचे सर्वोच्च मापदंड राखून सर्व मेट्रो मार्गाचे काम जलद पूर्ण होईल याची खात्री करतील.
टीम लीडर हा संचालक, मुख्य अभियंता किंवा अतिरिक्त मुख्य अभियंता या पदांवरील अधिकारी असेल. त्यांच्या नेतृत्वाखली असलेली टीम ही त्यांच्या अनुभवाचा उपयोग करून प्रकल्पाची काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्यासाठी तत्पर राहील. टीम लीडर प्रकल्पातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी, प्रगतीचा मागोवा घेण्यासाठी आणि प्रकल्प अंमलबजावणीच्या टप्प्यात उद्भवणाऱ्या सर्व समस्या कमी करून प्रकल्प प्रगतीसाठी कार्यरत राहतील. प्रकल्प व्यवस्थापन क्रियाकलापांच्या सर्वसमावेशक पर्यवेक्षणासाठी टीम लीडर जबाबदार असतील. त्यासोबत प्रकल्पाच्या भौतिक आणि आर्थिक प्रगती या दोन्हीच्या प्रगतीवर लक्ष ठेवणे, तसेच स्थानके, व्हायाडक्ट्स, डेपो, पूल, आणि प्रमुख अभियांत्रिकी इमारतींचे नियमित ऑन-साइट मूल्यांकन आयोजित करणे, मेट्रो मार्गीकेच्या परिसरात आणि मल्टी-मॉडल इंटिग्रेशन डेव्हलपमेंटच्या इ. कर्तव्यांचा समावेश आहे. हा उपक्रम मुंबई मेट्रो मार्गांच्या बांधकामाला गती देण्यासाठी आणि कोणत्याही संभाव्य विलंबाची शक्यता कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
“मुंबई मेट्रो प्रकल्प हे मुंबई महानगर प्रदेशाला दुसरी जीवन वाहिनी प्रदान करण्याची क्षमता आहे. मुंबईची आर्थिक आणि सामाजिक प्रगती ही उभारल्या जाणाऱ्या मेट्रो मार्गांवर बऱ्याच प्रमाणात अवलंबून असल्याने हे प्रकल्प वेळेत पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. नेमण्यात आलेले सर्व टीम लीडर हे सर्व मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी मोलाची कामगिरी बजावतील. मेट्रो प्रकल्पांमुळे नागरिकांच्या वाहतुकीच्या वेळेत बचत होणार असल्याने नागरिकांना कुटुंबासोबत घालवायला अधिक वेळ मिळणार आहे, ज्यामुळे त्यांचे कौटुंबिक आरोग्य अबाधित राहण्यास मदत होणार आहे. एमएमआरडीएच्या सर्व योजना या सर्वसमावेशक शहरी विकासाच्या दृष्टिने आखण्यात आल्या असून त्यांचा फायदा हा नागरिकांना नक्कीच होणार आहे. मेट्रो सह सर्व प्रकल्प निर्धारीत वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने यापुढे अशी अनेक धोरणं आम्ही अवलंबणार आहोत” असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. मुखर्जी, भा. प्र. से., म्हणाले.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra