Sunday, July 21, 2024
Homeताज्या घडामोडीRajavadi hospital : गर्भवती महिलेकडे नव-याचे आधारकार्ड नसल्याने उपचार नाकारले

Rajavadi hospital : गर्भवती महिलेकडे नव-याचे आधारकार्ड नसल्याने उपचार नाकारले

सामाजिक आणि रुग्णमित्र संस्थांनी व्यक्त केला रोष

घाटकोपर : सरकारी रुग्णालयांचा (Government Hospitals) ओंगळ कारभार अनेकदा समोर आला आहे. कधी कर्मचार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे तर कधी सुविधा अपुर्‍या पडल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. गर्भवती महिलेकडे (Pregnant woman) आधारकार्ड (Aadhar card) नसल्याने उपचार नाकारल्याची घटना घाटकोपरमधील सरकारी राजावाडी रुण्यालयात घडली. या घटनेबाबत अनेक अनेक सामाजिक आणि रुग्णमित्र संस्थांनी रोष व्यक्त केला.

ही गर्भवती महिला नालेसफाईचे काम करते. नालेसफाईदरम्यान ती अचानक खड्ड्यात पडल्याने तिला उपचारांकरता राजावाडी रुग्णालयात (Rajavadi Hospital) आणण्यात आले. त्यावेळी तिच्याकडे नवर्‍याचे आधारकार्ड नसल्याने तिला उपचार नाकारण्यात आला व तिला घरी पाठवण्यात आले. यापूर्वी ती शताब्दी रुग्णालयात गेली होती मात्र तिथेही तिला अशीच वागणूक मिळाली. या प्रकरणात आरोग्य जनहक्क समिती धावून आली. निव्वळ आधार कार्ड किंवा तत्सम कागदपत्र नसल्यास गर्भवतीवर उपचार किंवा तपासणीच होत नसल्याच्या तक्रारी समितीने केल्या.

तक्रारींची दखल घेत मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी या घटनेबाबत परिपत्रकाद्वारे स्पष्ट इशारा दिला आहे. आधारकार्ड नसल्याच्या कारणाने गर्भवती महिलेवर उपचार करणे नाकारल्यास आणि तपासाविना परत पाठविल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचे त्यांनी आदेश दिले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -