Thursday, September 18, 2025

राज ठाकरे यांच्या 'त्या' बॅनरवर आव्हाडांची शेरेबाजी

राज ठाकरे यांच्या 'त्या' बॅनरवर आव्हाडांची शेरेबाजी

मुंबई: आज शिवाजीपार्कवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ नेमकी कोणावर धडाडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच शिवसेना भवन समोरील एक बॅनर सर्वांच्या चर्चेचा विषय ठरते आहे. राजकीय वर्तुळात तर या बॅनरवरुन शेरेबाजीला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी यावर वक्तव्य करत राज यांच्यावर निशाणा साधला आहे. यामुळे मनसे विरुद्ध आव्हाड हा वाद समोर आला आहे.

राज यांच्या कार्यक्रमाच्या स्थळी कार्यकर्त्यांनी जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री असा बॅनर लावला आहे. यावर जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर भाष्य केलं आहे. जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत, असं जर त्यांना वाटत असेल तर चांगली गोष्ट आहे. मलाही वाटते मी जनतेच्या मनातील भारताचा पंतप्रधान आहे, असा टोला जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.

Comments
Add Comment