Thursday, March 26, 2026

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

वर्षाच्या पहिल्याच दिवशीच मुंबईत पाऊसच आगमन

मुंबई : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पाऊस आल्याने मुंबईकरांना आनंदाचा सुखत धक्का बसला आहे. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकर हे चितेंत पडलेले परंतु, पावसाच्या आगमननाने प्रदुषणाची तीव्रता कमी होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे.

गेले चार दिवसांत मुंबई शहरात थंड,ढगाळ वातावरणासोबत काही भागांत धुक्याचा प्रभाव जाणवत होता.वातावरणात थंडीच्या धुक्यासोबतच शहरातील वेगवेगळ्या भागात सुरू असलेल्या बांधकाम कामांची धूळ मिसळल्यामुळे दिवसभर मुंबई आणि उपनगरांच्या भागांवर या धूरक्याची चादर पसरलेली सर्वत्र दिसत होती मात्र, आज सकाळी अचानक पावसाचं आगमन झाले.हवामान विभागाच्या आंदजनुसार आज वातावरण मुख्यत: ढगाळ राहील आणि दिवसभरात हलक्या सरी कोसळतील.रात्री धुक्याचा हलका प्रभाव जाणवू शकतो.आजचे कमाल तापमान सुमारे २७ ते ३१ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ ते २० अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.पावसाची शक्यता अत्यल्प असून हवामान एकूणच सुखद राहणार आहे,असा अंदाज हवामान विभागाचा अंदाज आहे.

वाढत्या प्रदूषणात मुंबईकरांना दिलासा

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईतील हवेची गुणवत्ता सरासरी एक्यूआय १२० च्या आसपास होती. गेल्या वर्षी याच कालावधीत एक्यूआय १४८ होती. यावर्षी थोडी सुधारणा दिसली असली तरी, हवेतील प्रदूषण आरोग्यासाठी धोकादायक आहे. वाढत्या प्रदूषणावर उपाययोजना न केल्यानं मुंबई उच्च न्यायालयानं मनपा प्रशासनावर ताशेरेदेखील ओढले होते.मुंबईतील हवेची गुणवत्ता दिल्लीइतकीच वाईट होत चालल्याचं दिवसेंदिवस समोर येत असल्यानं चिंता व्यक्त होत आहे.

पुढील दोन दिवस मुंबईमधील हवामान कसे राहील?

२ जानेवारी रोजी मुंबईत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून तापमान २९ ते ३२ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. ३ जानेवारी रोजीही हीच परिस्थिती कायम राहणार असून तापमान ३१ ते ३३ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळच्या वेळी धुके असल्यानं वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी.सकाळ आणि संध्याकाळी थंडी जाणवू शकते.त्यामुळे स्वेटर किंवा जाकीट वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.पुढील दोन दिवस उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता असल्यानं बाहेरची कामे नियोजनबद्धरीत्या करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment