मालवण ( प्रतिनिधी ) : अखिल भारतीय गाबीत समाज महासंघ व गाबीत समाज महाराष्ट्र आणि गाबीत समाज सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने २७ ते ३० एप्रिल २०२३ या कालावधीत ४ दिवस “गाबीत महोत्सव”आयोजन मालवण दांडी किनारी करण्यात आले आहे.
याबाबत पूर्व नियोजनासाठी गाबीत समाजाची बैठक नुकतीच मालवण येथे पार पडली. यावेळी अखिल भारतीय गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष परशुराम उपरकर, गाबीत समाज महाराष्ट्र अध्यक्ष सुजय धुरत, गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर उपरकर, ऍड. काशिनाथ तारी, नारायण आडकर, कार्याध्यक्ष बाबा मोंडकर, राजन गिरप, मेघनाथ धुरी, दिपक तारी, सौ. स्नेहा केरकर, रविकिरण तोरसकर, महेंद्र पराडकर, संजय पराडकर, लक्ष्मण तारी, किरण कुबल, यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. महोत्सवासाठी सर्वाना सहभागी करून घेण्यासाठी ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वेंगुर्ला तालुका बैठक हुले यांचे होमस्टे मांडवी येथे आयोजित केली आहे. १२ मार्च रोजी देवगड शिक्षक भवन येथे सकाळी ११ वाजता बैठक आयोजित केली आहे. तसेच १३ मार्च रोजी मालवण येथील दांडेश्वर मंदिर येथे सकाळी ११ वाजता मालवण तालुका गाबीत समाज बैठक आयोजित केली आहे.
आणि १५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मालवण येथील दांडेश्र्वर मंदिर दांडी येथे सर्व जिल्हा व तालुका गाबीत बांधवांची बैठक होणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.