Sunday, May 31, 2026

IPL Final 2026 : गुजरात 155 धावांत गारद; RCB समोर 156 धावांचे लक्ष्य

IPL Final 2026 : गुजरात 155 धावांत गारद; RCB समोर 156 धावांचे लक्ष्य

Ahemdabad : आयपीएल 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत गुजरात टायटन्सला 20 षटकांत 8 बाद 155 धावांवर रोखले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या या महामुकाबल्यात गुजरातच्या आघाडीच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले आहे. आता आरसीबीला दुसरी आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी 156 धावांची गरज आहे.

सुरुवातीलाच गुजरातला मोठे धक्के

गुजरातच्या डावाची सुरुवात निराशाजjनक झाली. कर्णधार शुभमन गिल अवघ्या 10 धावांवर बाद झाला, तर साई सुदर्शनही 12 धावांवर माघारी परतला. अनुभवी जोस बटलरकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, मात्र तोही 19 धावांवर बाद झाला. पॉवरप्लेमध्येच तीन प्रमुख फलंदाज बाद झाल्याने गुजरातचा संघ दबावात आला. त्यामुळे त्यांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले.

वॉशिंग्टन सुंदरची झुंजार अर्धशतकी खेळी

एकीकडे विकेट्स पडत असताना वॉशिंग्टन सुंदरने संयमी फलंदाजी केली. त्याने 37 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी साकारत गुजरातचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. अखेरच्या षटकांत त्याने संघाला 150 धावांचा टप्पा ओलांडून दिला.

RCB गोलंदाजांचा दबदबा

बंगळुरूकडून रसिख सलाम दारने सर्वाधिक 3 विकेट्स घेत गुजरातच्या फलंदाजांना झटपट बाद केले. अनुभवी भुवनेश्वर कुमार आणि जोश हेझलवूड यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत गुजरातला आणखी धक्के दिले. कृणाल पंड्यालाही 1 बळी मिळाला.

RCB समोर 156 धावांचे आव्हान

दुसरे विजेतेपद जिंकण्यासाठी आता गतविजेत्या RCB ला 20 षटकांत 156 धावांची गरज आहे. विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, रजत पाटीदार आणि जितेश शर्मा यांच्यावर फलंदाजीची मोठी जबाबदारी असेल. दुसरीकडे राशिद खान, मोहम्मद सिराज आणि कगिसो रबाडाच्या गोलंदाजीच्या जोरावर गुजरात हा सामना रंगतदार करण्याचा प्रयत्न करेल. या सामन्यात आरसीबीच्या जिंकण्याच्या शक्यता जास्त मानल्या जात आहेत. बंगळुरू सलग दुसरे विजेतेपद पटकावणार की गुजरात पुनरागमन करणार, याचा फैसला काही तासांत होणार आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >