Thursday, June 19, 2025

ज्यांनी धोका दिलाय त्यांना धडा शिकवू! : अमित शहा

ज्यांनी धोका दिलाय त्यांना धडा शिकवू! : अमित शहा

कोल्हापूर: ज्यांनी धोका दिलाय त्यांना धडा शिकवू. आपल्याला बहुमत नाही तर संपूर्ण विजय हवाय. ४८ च्या ४८ जागा जिंकायच्या आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात महान भारताची रचना करायची आहे, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व्यासपीठावर उपस्थित होते.


उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती असताना प्रचारासाठी मोदी यांचे मोठे फोटो लावले. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या. निवडणुकीतील विजयानंतर यांच्या तोंडाला पाणी सुटले आणि उद्धव ठाकरे शरद पवारांच्या पायात जाऊन पडले, अशी घणाघाती टिका शहा यांनी केली.





दूध का दूध आणि पानी का पानी


आज दिवसभरात अमित शहा यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. सकाळी पुणे येथील शिवसृष्टीच्या लोकार्पण सोहळ्यात त्यांनी, एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत केले. ते म्हणाले की, शुक्रवारी 'दूध का दूध आणि पानी का पानी झाले' आहे. सत्यमेव जयतेचे सूत्र साकार झाले आहे. २०१४ ते २०२२ पर्यंत भारतातील निवडून आलेल्या सरकारांचा इतिहास जेव्हा जेव्हा लिहिला जाईल तेव्हा तो सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा