काँग्रेसचे २२ आमदार फुटणार - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेले आहे. शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवावे, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. एकीकडे सुनावणी सुरू असताना दुसरीकडे हे सरकार वाचवण्यासाठी भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले आहेत, असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. खैरे यांच्या विधानामुळे आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.


औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या बैठकीत बोलताना खैरे म्हणाले की, निवडणुकीत मुस्लिम समाजाची बोनस मते शिवसेनेला मिळतात. मुस्लिमांची २० टक्के मते शिवसेनेला मिळणार असून, ती आपली बोनस मते आहेत. तर लवकरच शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र होतील आणि हे सरकार पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फडणवीस यांनी काँग्रेसचे २२ आमदार तयार ठेवले असल्याचे विधान खैरे यांनी केले आहे. त्यामुळे यापूर्वी शिवसेनेत झालेली बंडखोरी आता काँग्रेसमध्ये पाहायला मिळणार का? अशी चर्चा रंगू लागली आहे.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये