Thursday, September 18, 2025

टी-२० विश्वचषकासाठी पंचांची घोषणा; यादीत एकमेव भारतीय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेकरिता आयसीसीने मॅच रेफरी आणि पंचासह (अंपायर) एकूण २० अधिकाऱ्यांची निवड केली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या यादीत नितीन मेनन हे भारतातील एकमेव अंपायर आहेत.

आयसीसीने टी-२० विश्वचषकाच्या पहिला टप्पा आणि सुपर-१२ फेरीसाठी एकूण २० सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली आहे. "एकूण १६ जण या स्पर्धेत पंचाची भूमिका बजावतील. ज्यात रिचर्ड केटलबरो, नितीन मेनन, कुमारा धर्मसेना आणि मरायस इरास्मस यांचा समावेश आहे.

आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी रंजन मदुगले टी-२० विश्वचषकाच्या आठव्या आवृत्तीसाठी सामनाधिकारी असतील. श्रीलंकेचा मदुगले यांच्यासह झिम्बाब्वेचा पायक्रॉफ्ट, इंग्लंडचा ख्रिस्तोफर ब्रॉड आणि ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड बून हेही या मेगा स्पर्धेत मॅच रेफरीच्या भूमिकेत दिसतील.

एड्रियन होल्डस्टॉक, अलीम डार, अहसान रजा, क्रिस्टोफर ब्राउन, क्रिस्टोफर गफानी, जोएल विल्सन, कुमारा धर्मसेना, लँग्टन रुसेरे, मरॅस इरास्मस, माइकल गफ, नितिन मेनन, पॉल रीफेल, पॉल विल्सन, रिचर्ड इलिंगवर्थ, रिचर्ड केटलबोरो, रॉडनी टकर हे आगामी विश्वचषक स्पर्धेकरिता अंपायरच्या भूमिकेत असतील. तर एंड्रयू पाइक्रॉफ्ट, क्रिस्टोफर ब्रॉड, डेविड बून आणि रंजन मदुगले हे मॅच रेफरी असतील.

Comments
Add Comment