मोहित सोमण: भारतातील ए आय इकोसिस्टीम मजबूत होत असताना विकासाचा पायाभूत उन्नती मार्ग म्हणून टेलिकॉम सबस्क्रिप्शनला ओळखले जाते. काल उशीरा टीआरएआय (Telecom Regulatory Authority of India) या नियामक मंडळांनी नोव्हेंबरपर्यंत टेलिफोन सबस्क्राईबरची संख्या जाहीर केली आहे. त्यातील निरिक्षणानुसार, प्रथमच टेलिकॉम सबस्क्राईबरची संख्या १ अब्ज (१०० कोटी) पार झाली आहे. आकडेवारीनुसार एकूण सबस्क्राईबरची संख्या १००३.६४ दशलक्ष झाल्याची माहिती नियामकांनी दिली आहे. यामध्ये वायरसह वायरलेस कनेक्शनचा समावेश आहे. नोव्हेंबर महिन्यात पोर्टेबिलिटीसाठी अर्ज केलेल्यांची संख्या माहितीनुसार १४.६९ दशलक्षावर पोहोचली आहे. हा मोठा आकडा पार झाल्याने दुर्गम भागातही टेलिकॉमचा जलद प्रसार होत असल्याचे दिसून येते.
टेक्नॉलॉजीचा प्रसार पाहता केवळ मोबाईल वायरलेस सबस्क्राईबरची संख्या नोव्हेंबर महिन्यात १०९०.९१ दशलक्षावर पोहोचली आहे. टेलिकॉमसाठी शहरी भागात एकूण ०.३७% वाढ नोव्हेंबर महिन्यात झाली असून ग्रामीण भागात ०.११% वाढ झाली आहे. तर एकूण टेलिकॉम सबस्क्राईबरची संख्या महिन्याच्या आधारे ०.२६% झाली. ब्रॉडबँड सबस्क्राईबरची संख्या नोव्हेंबर महिन्यात ०.३८% वाढली आहे.
रिलायन्स क्रमांक १ !
एकूण सबस्क्राईबरची संख्या पाहिल्यास रिलायन्स जिओ इन्फोकॉम क्रमांक १ वर (५१०.५२ दशलक्ष) असून क्रमांक २ वर भारती एअरटेल (३१४२.२६), क्रमांक ३ वर वोडाफोन आयडिया, ४ वर बीएसएनएल, ५ वर अरटिया कन्व्हरजंस टेक्नॉलॉजी लिमिटेडचा क्रमांक लागतो.
मार्केट शेअर-
नोव्हेंबर २०२५ पर्यंत एकूण टेलिकॉम कंपन्यांच्या मार्केट शेअरपैकी सर्वाधिक वाटा वायरलाईन सबस्क्राईबरसाठी रिलायन्स जियो (३०.९२%) असून त्यानंतर अनुक्रमे टाटा टेलिकम्युनिकेशन (२३.४४%), भारती एअरटेल (२२.८८%), बीएसएनएलचा (१५.९७%) क्रमांक लागतो.
वायरलेस सबस्क्राईबरपैकी वायरलेस (मोबाइल) ग्राहकांची संख्या ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस ११७१.८७ दशलक्षवरून नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस ११७३.८८ दशलक्षपर्यंत वाढली, ज्यामुळे ०.१७% मासिक वाढ नोंदवली गेली. शहरी भागांतील वायरलेस (मोबाइल) ग्राहकांची संख्या ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस ६३९.९९ दशलक्षवरून नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस ६४१.८३ दशलक्षपर्यंत वाढली आणि याच कालावधीत ग्रामीण भागांतील वायरलेस (मोबाइल) ग्राहकांची संख्या ५३१.८८ दशलक्षवरून ५३२.०६ दशलक्षपर्यंत वाढली. शहरी आणि ग्रामीण वायरलेस (मोबाइल) ग्राहकांचे मासिक वाढीचे दर अनुक्रमे ०.२९% आणि ०.०३% होते.
वायरलेस (मोबाइल + फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस) ग्राहकांची संख्या ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस ११८४.६२ दशलक्षवरून नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस ११८७.४८ दशलक्षपर्यंत वाढली, ज्यामुळे ०.२४% मासिक वाढीची नोंद झाली. शहरी भागांतील एकूण वायरलेस सबस्क्रिप्शन ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी ६४७.८२ दशलक्षवरून ३० नोव्हेंबर २०२५ रोजी ६५०.२२ दशलक्षपर्यंत वाढले. याच कालावधीत ग्रामीण भागांतील सबस्क्रिप्शन देखील ५३६.८० दशलक्षवरून ५३७.२६ दशलक्षपर्यंत वाढले. शहरी आणि ग्रामीण वायरलेस सबस्क्रिप्शनचा मासिक वाढीचा दर अनुक्रमे ०.३७% आणि ०.०९% होता.
एकूण सबस्क्राईबर वाढलेला बेस (Wire+ Wireless)-
भारतातील एकूण टेलिफोन ग्राहकांची संख्या ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस १२३१.३८ दशलक्ष वरून नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस १२३४.५३ दशलक्ष झाली, ज्यामुळे ०.२६% चा मासिक वाढीचा दर दिसून आला. शहरी टेलिफोन ग्राहकांची संख्या ऑक्टोबर २०२५ च्या अखेरीस ६८९.६१ दशलक्ष वरून नोव्हेंबर २०२५ च्या अखेरीस ६९२.१६ दशलक्ष झाली आणि ग्रामीण टेलिफोन ग्राहकांची संख्या देखील याच कालावधीत ५४१.७७ दशलक्ष वरून ५४२.३७ दशलक्ष झाली. नोव्हेंबर २०२५ या महिन्यात शहरी आणि ग्रामीण टेलिफोन ग्राहकांच्या मासिक वाढीचे दर अनुक्रमे ०.३७% आणि ०.११% होते.
कनेक्टिव्हिटीमधील ही वाढ सरकारच्या टेलिकॉम क्षेत्रातील केलेल्या परिवर्तनामुळे व प्रगत दूरसंचार पायाभूत सुविधांवर सुधारणा साधण्यासाठी केलेल्या धोरणात्मक बदलाचे फलित आहे. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये स्थापन झालेल्या भारत ६जी अलायन्सच्या प्रगतीबद्दल माहिती दिली होती. त्याचा आढावा त्यांनी वेळोवेळी घेतल्याने बदलत्या धोरणाचा फायदा टेलिकॉम व टेक्नॉलॉजी क्षेत्रात दिसत आहे.







