गोंदिया (हिं.स.) : अवैध तलवारी बागळल्या प्रकरणी २ आरोपींना अटक केल्याची घटना गोंदिया जिल्ह्यात घडली असून यात १३ तलवारी सह आरोपी सोबत विधिसंघर्ष बालकास अटक केली आहे. गोंदिया जिल्ह्यात अवैध शस्त्रे व हत्यारे बागळण्याविरुद्ध मोहीम सुरू असताना एक पथक तयार करण्यात आले आहे.
दरम्यान पथकाने दवणीवाडा पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या नीलागोंदी येथे खेमलाल बुधुलाल मस्करे यांच्या घरी काही संशयितरित्या आढळुन आल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली, पोलिसांनी नीलागोंदी येथे पोहचत मस्करे यांच्या घराची झडती घेतली असता त्यांच्या कडून १३ नग लोखंडी तलवार आढळून आल्या.
तलवारी कुठून आणल्या या बाबत चौकशी केली असता तलवारी आरोपीचा भाचा विधिसंघर्ष बालकांनी आणल्याचे कबूल केले. विधिसंघर्ष बालकांनी तलवारी आणल्याचे कबूल केले असता दोघांच्या विरुद्ध परवाना नसताना अवैध तलवारी बागळल्या प्रकरणी पोलीस स्टेशन दवनिवाडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तलवारी आणल्या कुठून काही मोठा घातपात घडवण्याची तयारी तर करत नव्हते त्या दिशेने पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. गोंदिया जिल्हा हा मध्यप्रदेश, छतिसगढ, राज्याला लागून असल्याने या राज्यात तर तस्करी तर केली जात नव्हती याचाही तपास पोलीस करीत आहेत.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…