३७ अधिकाऱ्यांना 'एव्हिएशन विंग्स' प्रदान

  78

नाशिक( प्रतिनिधी ) : नाशिक रोड येथील कॉम्बॅट एव्हिएटर्स ट्रेनिंग (कॅट्स) स्कूलमधून यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या ३७ अधिकाऱ्यांना कॉम्बॅट हेलिकॉप्टर पायलट बनण्यासाठी प्रतिष्ठित ' एव्हिएशन विंग्स' प्रदान करण्यात आले. भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलटला प्रतिष्ठित एव्हिएशन विंग मिळाल्याने आर्मी एव्हिएशनसाठी अभिमानाची बाब आहे, असे प्रतिपादन आर्मी एव्हिएशनचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी यांनी केले.


नाशिक रोड येथील कॉम्बॅट एव्हिएटर्स ट्रेनिंग (कॅट्स) स्कूल येथे आयोजित दीक्षांत समारंभात आर्मी एव्हिएशनचे महासंचालक आणि कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजय कुमार सुरी अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलटने प्रतिष्ठित 'एव्हिएशन विंग' मिळवल्यामुळे आर्मी एव्हिएशनसाठी हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना विमान उड्डाणाचे कठोर प्रशिक्षण देण्यात आले. विविध विषयांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले आहे.


कॅप्टन आशिष कटारिया यांना एकंदर गुणवत्तेत प्रथम स्थान मिळाल्याबद्दल 'सिल्व्हर चीता' ट्रॉफी आणि 'बेस्ट इन फ्लाइंग'साठी कॅप्टन एसके शर्मा सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. कॅप्टन श्रवण मणिलथया पीएम यांना 'एअर ऑब्झर्व्हेशन पोस्ट-३५' ट्रॉफी ग्राउंड विषयात प्रथम आल्याबद्दल प्रदान करण्यात आली. प्री आर्मी पायलट कोर्स अनुक्रमांक ३५ मध्ये प्रथम राहण्याची ' फ्लेडलिंग ' ट्रॉफी कॅप्टन अभिलाषा बराक यांना देण्यात आली. तसेच बेस्ट इन गनरीसाठी ' कॅप्टन पी के. गौर ' ट्रॉफी कॅप्टन आर. के. कश्यप यांना देण्यात आली.


“अभिलाषा” ठरल्या महिला हवाई सैन्य अधिकारी


भारतीय सैन्यदलात देशातील पहिली महिला हवाई सैन्य अधिकारीपदी अभिलाषा विराजमान झाल्या आहेत. अभिलाषा यांना सन्मानाचे 'एव्हिएशन विंग' प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना फ्लेडलिंग ट्रॉफीने सन्मानित करण्यात आले आहे. आर्मी एव्हिएशन कॉर्प्सने ३५ गौरवशाली वर्षे पूर्ण केली आहेत. २०१९ मध्ये भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रतिष्ठित राष्ट्रपतींचे 'कलर्स' प्रदान करण्यात आले होते. आर्मी एव्हिएशन हे निर्विवादपणे एक शक्तिशाली शक्ती गुणक आहे. एक प्रमुख लढाऊ सक्षम आणि भारतीय लष्कराची एक महत्त्वाची लढाऊ शाखा आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम