संपकरी एसटी कर्मचाऱ्याला हृदयविकाराचा झटका

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी विलीनीकरण करा, अशी मागणी करणारे कर्मचारी महेश बाबूराव सलगर यांना संपात सक्रिय असताना हृदयविकाराचा झटका आल्याची घटना घडली आहे.

संपात सहभागी झाल्यामुळे एसटी प्रशासनाने त्यांची बदली केली होती. पंढरपूर ते बार्शी अशी त्यांची बदली केल्यानंतर ते अनेक दिवस त्रस्त होते. मात्र सलगरे हे विलीनीकरणाच्या दुखवट्यामध्ये सामील होते. यामुळे १८ डिसेंबरपासून ताण आल्याने अश्विनी सहकारी रुग्णालय कुंभारी येथे दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

पुन्हा त्यांना मूत्रविकाराचा त्रास होत असल्याने रघोजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. पुन्हा हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले.
Comments
Add Comment

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे

मालेगाव महापालिकेत नमाजपठण कशाला? हे तर ‘जिहाद’चेच रूप - नितेश राणे

- राज्यातील सर्व मदरसे बंद करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार - नितेश राणे मुंबई : निवडणुकीच्या पूर्वी ‘जय