मुंबई : मुंबईत नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या सेलिब्रेशन पार्टीवर बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी नवीन वर्षानिमित्त होणारे कार्यक्रम, पार्टी रद्द करण्यात येणार असल्याचे मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या वाढली आहे. त्यापार्श्वभूमीवर पालक मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिका मुख्यालयात आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोरोनाशी संबंधित माहिती दिली.
आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले की, कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. मात्र, तरीदेखील काळजी घेणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. कोरोना निर्बंधांचे सर्वांना पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले. निर्बंधांचे उल्लंघन करून हॉटेल, रेस्टोरंट्स सुरू झाल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
इमारतींच्या टेरेसवरील पार्टीबाबतही लोकांनी फेरविचार करावा असे आवाहनही त्यांनी केले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असले तरी काळजी घेणे आवश्यक आहे. मास्कचा वापर करणे, अनावश्यक प्रवास टाळला पाहिजे असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
शाळा बंद ठेवण्याचा निर्णय तूर्तास घेण्यात येणार नसल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. शाळा, महाविद्यालये कोरोनामुळे बंद ठेवण्याबाबत एक धोरण ठरवण्यात आले आहे. त्यानुसार राज्य सरकार पुढील निर्णय घेणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
मुंबई : महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने फ्रान्समधील कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (Cannes…
मुंबई : सध्या उष्णतेत वाढ होत आहे. घराबाहेर पडताना नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना…
तुमच्या शरीराला होतील ५ फायदे मुंबई: उन्हाळ्याच्या दिवसात हळू हळू पारा वाढू लागतो.उन्हाळ्यात दुपारी आकाशातून…
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी राहत्या घरी…
बदलापूर : मध्य रेल्वेच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंबरनाथ,टिटवाळा, बदलापूर या ठिकाणाहून मुंबई…
पुणे : माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे आणखी एक माजी आमदार महायुतीच्या वाटेवर…