पुणे : कोरोनामुळे पुण्यात तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कारागृहातून दोन कैदी फरार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुरुंग अधिकारी बाळु शिंदे यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा परिसरात हे तात्पुरते कारागृह तयार करण्यात आले आहे. येरवडा येथील महात्मा ज्योतिबा फुले मुलांचे वसतिगृह येथे तात्पुरते कारागृह सुरू करण्यात आलेले आहे. न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या कैद्यांना या ठिकाणी ठेवले जाते.
पळून गेलेल्या दोन्ही कैद्यांना या ठिकाणी ठेवण्यात आले होते. हे दोघेही लघु शंकेचा बहाना करून तात्पुरत्या कारागृहातून बाहेर आले. त्यानंतर तेथील सुरक्षा रक्षकाची नजर चुकवून दोघेही तात्पुरत्या कारागृहातून पसार झाले. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यांचा शोध घेतला जात असल्याचे सांगण्यात आले. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत.
चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…