वीजबिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

Share

जळगाव : जळगावातील सिंधी कॉलनीत वीज बिलाच्या वसुलीसाठी गेलेल्या महावितरण कंपनीच्या अभियंत्याच्या डोक्यात टिकाव घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून मारहाण करणार्‍यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधी कॉलनीतील टिकमराम परमानंद पोपटानी यांनी ७५ दिवसांपासून वीजबिल भरले नव्हते. या वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता जयेश तिवारी सिंधी कॉलनीत गेले. त्यांनी पोपटानी यांना वीजबिल भरण्यास सांगितले. याचा राग आल्याने पोपटानी यांनी घरातून चक्क खोदकाम करण्यासाठी वापरल्या जाणारा टीकाव आणला व शिवीगाळ करत तिवारी यांच्या डोक्यात टाकून जीव घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिवारी यांच्यासोबतच्या इतर कर्मचाऱ्यांनी वेळीच मध्यस्थी केल्याने अनर्थ टळला.

त्यांनी पोपटानी यांना बाजूला केले. मात्र, तरीही पोपटानी यांनी मारहाणीचा प्रयत्न केला. या प्रकरणी अभियंता तिवारी यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित टिकमराम पोपटानी याला अटक केली आहे.

अभियंत्यासोबत असलेल्या कर्मचार्‍यांनी संबंधित घटनेचे मोबाइलमध्ये चित्रीकरण केले. त्यात पोपटानी महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करताना दिसत आहे. शिवीगाळ, आरडाओरड करत गोंधळ घालताना दिसत आहे. या घटनेने वीज कंपनीच्या कर्मचार्‍यांसह अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वीज बिलाच्या वसुलीसाठी एकीकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सक्ती तर दुसरीकडे अशा पद्धतीने ग्राहकांकडून जीवघेणे हल्ले होत असतील तर काम कसे करायचे, असा प्रश्न वीज कर्मचाऱ्यांमधून उपस्थित होत आहे.

Recent Posts

MI vs CSK, IPL 2025: मुंबई इंडियन्स मागील पराभवाचा वचपा काढणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…

21 minutes ago

लिंबू लोणचं

पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…

40 minutes ago

पुण्यात काँग्रेसला गळती, नेते आणि पदाधिकारी महायुतीच्या वाटेवर

पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…

51 minutes ago

भाषा हे राजकारण्यांच्या हातातले हत्यार नाही!

डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…

53 minutes ago

आदिवासी जमातीसाठी ती ठरली आरोग्यदूत

अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…

59 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, रविवार, २० एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…

1 hour ago